Published On : Sun, Jan 19th, 2020

जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते पल्स पोलीओ लसीकरणाचा शुभारंभ

गडचिरोली: रविवारी सकाळी पल्स पोलीओ मोहिमेचे उद्घाटन अंगणवाडी केंद्र, नवेगांव येथे दीपक सिंगला, जिल्हाधिकारी यांचे हस्ते बालकाला पोलीओ डोजचे ड्रॉप पाजून करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी सर्व पालकांनी आपल्या 5 वर्षाखालील बालकाला पल्स पोलीओ लसीरकण करुन घ्यावे असे आवाहन यावेळी त्यांनी उपस्थितांना केले. पल्स पोलीओ लसीकरण मोहीमे अंतर्गत दि.19 जानेवारी 2020 रोजी जिल्ह्यांतील 0 ते 5 वयोगटातील एकूण 90 हजार 353 बालकांना पोलीओ डोज देण्यात येणार आहे.

त्यासाठी आरोग्य विभागाकडून ग्रामीण भागामध्ये 2075 व शहरी शहरी भागाकरीता 48 बुथ असे एकूण 2123 बुथ अंगणवाडी, उपकेंद्र, प्रा.आ.केंद्र, बस स्टॅण्ड तसेच इतर गर्दीच्या ठिकाणी लावण्यात आले असून या बुथवर काम करण्यासाठी एकूण 6440 मनुष्यबळ कार्यरत आहे. त्यासाठी आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या, आरोग्य कर्मचारी अशी यंत्रणा सज्ज असून सर्व बालकांना पोलीओ डोज पाजण्यात येणार आहे. सर्व केंद्रावर लस उपलब्ध असून सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पोलीओ बुथ सुरु राहणार आहे. काही कारणाने आज लसीकरण करता आले नाहीच तर सुटलेल्या बालकांकरीता दि. 21 जानेवारी ते 23 जानेवारी दरम्यान आरोग्य कर्मचारी घरोघरी आय.पी.पी.आय द्वारे बालकांना पोलीओचे डोज देतील.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती कौशिक, पं.स.सभापती, एम.बी.इचोडकर, नवेगाव येथील सरपंच श्रीमती प्रतिभाताई चौधरी, पोलिस पाटील, ग्रा.पं. सदस्य आणि गावातील प्रतिष्ठित नागरीक तसे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद डॉ. शशिकांत शंभरकर, माता बाल संगोपण अधिकारी डॉ. सुनिल मडावी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मशाखेत्री, व इतर आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.