Published On : Fri, Jun 11th, 2021

कोरोना च्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सावधगिरी बाळगा जिल्हाधिकारी

Advertisement

– तहसील कार्यालयात आढावा बैठक

कामठी. -जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज गुरूवारला तहसील कार्यालयात कोरोना बाबत आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीत कोरोनाच्या संभावित तिस-या लाटेची पूर्व नियोजित तयारी करण्याबाबत स्थानिक नगर सेवक व सामाजिक कार्यकर्ता सोबत चर्चा करण्यात आली. बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर, उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर, तहसीलदार अरविदं हिंगे, नगराध्यक्ष शाहजहां शफाअत अंसारी, उपाध्यक्ष अहफाज अहमद आदि प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी ठाकरे यांनी नगर सेवकांना नागरिकांच्या घरोघरी जावून त्यांना जागृत करणे, कोणत्याही नागरिकांना ताप, खोकला असल्याचे दिसताच त्यांच्यावर घरघुती उपाय करण्यापेक्षा कोरोना ची चाचणी करून घेणे गरजेचे असल्याचे त्यंानी सांागितले. कदाचित कुणी संक्रमित असले तरी सुध्दा सुरूवातीला निदान झाल्यास उपचार करणे सोपे होणार. परंतु दुर्लक्ष केल्यास याचे गंभीर परिणाम स्वतःला व कुुटूंबाला होण्याची शक्यता असते.

कामठी शहरातील जनतेत लसी विषयी उत्साह कमी प्रमाणात असल्याचे आतापर्यत झालेल्या लसीकरणावरून दिसून आले, असेही जिल्हाधिका-यांनी सांगितले. या विषयी जनतेला जागृत करून लसीकरण करणे किती गरजेचे आणि सुरक्षित आहे, हे पटवून देण्याचे आवाहान त्यांनी यावेळी केले. म्युकरमायकोशिस येण्याची दाट शक्यता आहे. असल्या महामा-या पावसाळयात होणा-या हवामानाच्या बदलत्या वातावरणात होत असतात. प्रत्येकाला लाखो रूपये खर्च करणे परवडण्यासारखे नसल्याने आताच सावधगिरी बाळलेले बरी, असा सल्लाही जिल्हाधिकारी ठाकरे यांनी यावेळी दिला.