Published On : Mon, Jun 17th, 2019

कलकत्ता येथील शिकाऊ डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ डॉक्टर संघटनेचे सामूहिक निवेदन

Advertisement

कामठी : रोजी कलकत्ता येथील शिकाऊ डॉक्टरांवर काही समाज कंटकांनी हल्ला केला व त्यात त्यांना गंभीर जीवघेणी दुखापत झाली त्यातील काही शिकाऊ डॉक्टर्स व्हेंटिलेटरवर मरणाशी झुंज देत आहेत अशा वारंवार होणाऱ्या भ्याड हल्ल्याच्याअ निषेधार्थ आय एम ए (इंडियन मेडिकल असोसिएशन)कामठी -कन्हान च्या डॉक्टर संघटनेच्या वतीने आज 17 जून ला सकाळी 6 ते दिनांक 18 जून ला सकाळी 6 वाजेपर्यंत बाह्य रुग्ण सेवा बंद ठेवण्यात आलेली आहे यात फक्त आकस्मिक रुग्ण सेवा सुरू ठेवलेली आहे.तसेच घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज नवीन कामठी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक बापू ढेरे यासह जुनी कामठी पोलीस स्टेशन तसेच तहसील प्रशासनाला सामूहिक निवेदन देण्यात आले.

पश्चिम बंगाल ची राजधानी असलेल्या कलकत्ता शहरामध्ये गत आठवड्यात रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.त्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड करून डॉक्टरांवर हल्ला केला होता.डॉक्टर हा समाज जीवनातील महत्वाचा घटक असून आपल्या रुग्णाप्रति जागृतही असतो परंतु कधीकधी त्याच्या अथक प्रयत्नानंतर रुग्णाचा जीव वाचविण्यात त्यांना यश येत नाही .

Gold Rate
23 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,57,800/-
Gold 22 KT ₹ 1,46,800/-
Silver/Kg ₹ 3,29,800 /-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रुग्ण दगावल्यानंतर त्यांचे नातेवाईक डॉक्टरांना दोषी धरून त्यांना नाहक मारहाण करतात .कलकत्ता मध्ये शिकाऊ डॉक्टरांवर झालेला भ्याड हल्ला हे त्याचे वास्तविक उदाहरण आहे तेव्हा डॉक्टरांवर दिवसागणिक वाढणारे हल्ले थांबविण्यासाठी सरकारने कायदा करावा तसेच कलकत्ता येथील शिकाऊ डॉक्टरांवर हल्ला करण्यात आलेल्या हल्लेखोरांना किमान सात वर्षाचा तुरुंगवास होणारा कायदा करावा व दोषींवर कठोर कारवाही व्हावी या माग्नीसह कामठी -कन्हान आयएमए च्या डॉक्टर संघटनेकडून निवेदन सादर करण्यात आले.

हे निषेधार्थ सामूहिक निवेदन आयएमए चे अध्यक्ष डॉ पितांबर मसराम यांच्या नेतृत्वात देण्यात आले याप्रसंगी डॉ राजेंद्र अग्रवाल, डॉ नकीब अहमद, डॉ राजेंद्र चौधरी, डॉ रतन रॉय , डॉ अनिल मंगतानी, डॉ वसीम, डॉ विनोद पवार, डॉ सौरभ माहुरे, डॉ तमीम अहमद, डॉ ताजमी, डॉ निशी रॉय, डॉ सौरभ अग्रवाल आदी उपस्थित होते.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement