कृष्ठरोग निर्मूलनाकरिता सहकार्य करा:-डॉ संजय माने
कामठी :-कामठी तालुक्यात पंतप्रधान प्रगत योजने अंतर्गत राष्ट्रीय कृष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम हाती घेण्यात आला असून अंगावर बधिर, न खाजनारा, फिक्कट चट्टा असल्यास कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयासह ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून कृष्ठरोग निर्मूलनासाठी सहकार्य करण्याचे आव्हान तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय माने यांनी केले आहे.
डॉ संजय माने यांनी सांगितले की कृष्ठरोग हा जिवाणूंमुळे होणारा सांसर्गिक आजार आहे .अंगावर असणारा फिक्कट लालसर रंगाचा बधिर चट्टा व हाता पायामध्ये अशक्तपणा येणे हे कृष्ठरोगाची प्रमुख लक्षणे आहेत .कानाच्या पाळ्या जाड होणे, चेहरा लालसर, तेलकट व जाड होणे , त्वचेची संलग्न मज्जा जाड व दुखऱ्या होणे हे देखील कृष्ठरोगाची लक्षणे होऊ शकतात .
यावर बहुविध उपचार घेतल्यास कृष्ठरोगाची विकृती टाळणे शक्य आहे.बहुविध आयषधोपचार सर्व आरोग्य संस्थेत मोफत उपलब्ध आहे.अपूर्ण व अर्धवट उपचारा मुळे लुळे पडणे, हाता पायाची बोटे वाकडी होऊन विकृती येऊ शकते या आजारातील रुग्ण घरी राहूनही उपचार घेऊ शकतो .
कृष्ठरोग हा सर्व वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो असे असले तरी हा आजार बहुविध औषधोपचाराने पूर्णपणे बरा होत असल्याने लक्षणे दिसताच घाबरून न जाता नजीकच्या शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी करून कृष्ठरोग मुक्त समाज घडविण्यासाठी सहकार्य करण्याचे आव्हान तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय माने यांनी केले आहे
सांडूप कांबळे कामठी