Published On : Wed, Apr 14th, 2021

घाटरोहणा शिवारात ३ लाख ७०हजार ४६०रुपये चा कोळसा जप्त

– अवैधरीत्या कोळसा सहीत तीन आरोपीना अटक

कन्हान:-पोलीस स्टेशन पासुन १२ किलो मीटर अंतरावर असलेल्या पश्चिम दिशेने मौजा धाटरोहणा डब्लू.सी.एल. गोडेगाव परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना काही अज्ञात आरोपी गोंडेगाव बस्ती व घाटरोहणा शिवारात एच.ओ .ई. डंम्पिंग यार्ड च्या मागे चोरून ठेवलेल्या कोळश्याचे ढिगारे जेसीबी च्या मदतीने ट्रक मध्ये भरून डब्लु सी एल च्या वजन काट्यावर वजन करुन एकुण ९२,५९० किलो चोरीचा कोळसा किंमत अंदाजे ४ रुपये किलो प्रमाणे ३,लक्ष ७०,हजार ४६० रुपयाचा कोळसा डब्ल्यु सी एल मध्ये जमा करण्यात आला . कन्हान पोलीसांनी फिर्यादी ओमप्रकाश रामचंद्र पाल यांचा तक्रारी वरुन अपराध क्रमाक ११०/२१नुसार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन ही कलम३०९,३४भादवी नुसार कारवाई करण्यात आली आहे .

स्थानिय पोलिस ०दारे प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार दिनांक १२ एप्रिल २०२१ ला दुपारी २:०० ते ६:०० वाजता च्या सुमारास फिर्यादी ओमप्रकाश रामचंद्र पाल यांचा माहिती वरुन डब्लु.सी.एल गार्ड व पो. स्टे. स्टाॅप सह मा.परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांचे सह डब्लु सी एल परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना यातील आरोपी
१) फारुक अब्दुल्ला , राहणार फुकट नगर कांन्द्री
२) कुंजन तिजारे , राहणार फुकट नगर कांन्द्री
३) उमेश पांनतावने राहणार कांन्द्री , कन्हान असे हे तीन आरोपी गोंडेगाव बस्ती व घाटरोहणा शिवारात असलेल्या एच.आ.ई डंम्पिंग च्या मागे चोरून ठेवलेल्या कोळश्याचे ढिगारे ला पोलिसानी जेसीबी च्या मदतीने ट्रक मध्ये भरून डब्लु सी एल च्या वजन काट्यावर वजन करुन एकुण ९२,हजार ५९० किलो चोरीचा कोळसा किंमत अंदाजे ४ रुपये किलो प्रमाणे ३,लक्ष ७०,हजार ४६० रुपयाचा कोळसा डब्ल्यु सी एल मध्ये जमा करण्यात आला . असे फिर्यादी च्या तोंडी रिपोर्ट वरुन कन्हान पोलीसांनी तीन ही आरोपी विरुद्ध कलम ३७९ , ३४ भा.द.वि अन्वये गुन्हा दाखल करुन ही कारवाई करण्यात आली आहे .

सदर कारवाई परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशन चे ए पी आई अमितकुमार आत्राम , ए पी आई सतिश मेश्राम , पो.शि..शरद गीते , मुकेश वाघोड ,कुणाल पारधी, संजु बरोदिया, राहुल र२गारी,चौहान सह अन्य पोलिससह आदि ने ही कारवाई केली .

– कमलसिंह यादव