Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Apr 21st, 2021

  मुख्यमंत्र्यांचा ऑनलाईन संवाद रद्द, लॉकडाऊनचा निर्णय मुख्य सचिव जाहीर करणार; नवे नियम कोणते ?

  मुख्यमंत्र्यांचा ऑनलाईन संवाद रद्द, लॉकडाऊनचा निर्णय मुख्य सचिव जाहीर करणार ( uddhav thackeray lockdown decision corona cases)


  मुंबई : राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असली, तरी करोना संसर्ग कमी झालेला नाही. करोनाग्रस्तामध्ये वाढ कायम असून, मृतांची संख्यासुद्धा वाढत आहे. याच कारणामुळे राज्यात काळजी वाढली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून कडक लॉकडाऊनच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, पंतप्रधानांनी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणून वापरण्याचं आवाहन केलं आहे. राज्यात लॉकडाऊन लावण्याचे निश्चित झाले असून त्याचा निर्णय राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांच्या मार्फत जारी केला जाईल, अशी माहिती मिळत आहे. (Maharashtra CM Uddhav Thackeray cancelled his live conversation lockdown decision due to increase in Corona cases will be announced by Chief Secretary)

  मुख्य सचिव लॉकडाऊनचे आदेश काढणार
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन संदर्भात जनतेशी संवाद साधून त्याबद्दल भूमिका मांडतील असं मंत्रिमंडळ बैठकीनंतर ज्येष्ठ मंत्र्यांनी जाहीर केलं होतं मात्र नाशिक ऑक्सिजन दुर्घटनेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आजचा फेसबुक संवाद रद्द केल्यान संपूर्ण लॉकडाऊन संदर्भातील अध्यादेश मुख्य सचिवांच्या मार्फत जाहीर होईल अशी माहिती मिळत आहे. हा अध्यादेश राज्य सरकार कधी जाहीर करणार; तसेच यामध्ये नवे नियम काय असतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  राज्यात लॉकडाऊन करावाच लागेल
  मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रोज हजारो रुग्ण आढळत आहेत. तसेच रोज मृतांचा आकडासुद्धा वाढत आहेत. रुग्ण वाढत असल्यामुळे राज्यात आरोग्य व्यवस्थासुद्धा तोकडी पडत आहेत. याच कारणामुळे राज्यात लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नाही, असे मत राज्य मंत्रिमंडळाने काल (20 एप्रिल) व्यक्त केले होते. तशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. यावेळी बोलताना त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊन लागू करण्याचे ठरले असून तो निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल असेसुद्धा सांगितले होते.

  मुख्यमंत्र्यांचा ऑनलाईन संवाद रद्द
  राज्यात लॉकडाऊन लागू करणार हे ठरलेले आहे. मात्र, याविषयीचा अधिकृत निर्णय हे मुख्यमंत्री जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच ठाकरे हा निर्णय आज (21 एप्रिल) फेसबुक तसेच इतर माध्यमांतून जनतेशी लाईव्ह संवाद साधून जाहीर करतील असेसुद्धा सांगण्यात येत होते. मात्र, नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आपला ऑनालाईन संवाद रद्द केल्याचे सांगण्यात येत आहे. त्या ऐवजी आता लॉकाडाऊनचा निर्णय हा राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुटे यांच्या मार्फत जाहीर केला जाईल, असे सांगण्यात येत आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145