Published On : Thu, Mar 25th, 2021

सीएमआरएस १ दिवसीय नागपूर मेट्रोच्या दौऱ्यावर

Advertisement

– उज्ज्वल नगर, छत्रपती चौक, काँग्रेस नगर आणि धरमपेठ कॉलेज मेट्रो स्टेशनची करणार पाहणी


नागपूर : ऑरेंज लाइन(रिच १ ) आणि अँक्वा लाईन (रिच ३) येथील मेट्रो स्टेशनचे परीक्षण करण्यासाठी उद्या दिनांक २६ मार्च २०२१ (शुक्रवार) रोजी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) श्री. जनक कुमार गर्ग आणि त्यांचे सहयोगी उज्ज्वल नगर, छत्रपती चौक, काँग्रेस नगर आणि धरमपेठ कॉलेज मेट्रो स्टेशनचे परीक्षण करणार आहे.

सद्यस्थितीत ऑरेंज आणि ऍक्वा लाईन मिळून एकूण १७ मेट्रो स्थानकांवरून प्रवासी सेवा सुरु आहे यामध्ये आणखी ४ नवे मेट्रो स्थानके जुळल्यास मोठ्या प्रमाणात नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

ऑरेंज लाईन मार्गिकेवरील उज्ज्वल नगर (८८००.००), छत्रपती चौक (१२५६८.००),काँग्रेस नगर (८१००. ००) ऍक्वा लाईन वरील धरमपेठ कॉलेज (५४२७. ०३) वर्ग मीटर क्षेत्रामध्ये मेट्रो स्टेशनची उभारणी करण्यात आली आहे. स्टेशनच्या दोन्ही (उत्तर व दक्षिण) बाजूने आगमन/निर्गमनची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. ग्राउंड लेव्हल, कॉनकोर्स लेव्हल आणि प्लॅटफॉर्म अश्या तीन मजलीच्या दुसऱ्या म्हणजेच कॉनकोर्स लेव्हलवर तिकीट काउंटर व स्टेशन कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे.