Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Mar 26th, 2021

  ”सीएमआरएस” ने केली धरमपेठ कॉलेज, काँग्रेस नगर,छत्रपती चौक आणि उज्ज्वल नगर मेट्रो स्टेशनची पाहणी

  – स्टेशन परिसरातील सोयी सुविधा व तांत्रिक बाबींचा घेतला आढावा

  नागपूर – ऑरेंज लाईन आणि ऍक्वा लाईन मार्गिकेवरील उर्वरित मेट्रो स्टेशनच्या कार्याचे परीक्षण करण्यासाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) श्री. जनक कुमार गर्ग, दिनांक २६ मार्च रोजी नागपुर येथे पोहोचले. त्यांनी (रिच ३ – अँक्वा लाईन) धरमपेठ कॉलेज व (रिच १ – ऑरेंज लाईन) येथील काँग्रेस नगर, छत्रपती चौक आणि उज्ज्वल नगर मेट्रो स्टेशनची पाहणी करत स्टेशन परिसरात प्रवाश्यांकरता असलेल्या विविध सोई-सुविधांचे निरीक्षण केले. स्टेशन परिसरात करण्यात आलेल्या सोयी-सुविधा सोबत सुरक्षेचा आढावा श्री. गर्ग यांनी मेट्रो अधिकाऱ्याकडून घेतला. रेल्वे सुरक्षा अयुक्त श्री. जनक कुमार गर्ग यांनी चारही मेट्रो स्टेशनच्या पाहणी दरम्यान समाधान व्यक्त केले.

  सीएमआरएसच्या अधिकाऱ्यांनी निरीक्षण दरम्यान एएफसी गेट, इंमरजंसी कॉल पॉईंट,प्लेटफार्म परिसरातील इंमरजंसी स्टॉप प्लंगर, लिफ्ट आणि एस्केलेटर, स्टेशन परिसरात प्रवाश्यांकरीता करण्यात आलेल्या सोई-सुविधा उदा. प्रसाधानगृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बेबी केयर रूम, दिव्यांगाकरिता विशेष प्रसाधन गृह,मार्गदर्शिका,सूचना बोर्ड इ.,ची पाहणी केली. याव्यतिरिक्त सीएमआरएस पथकाने सिग्नलिंग उपकरण खोली, टेलीकॉम उपकरण खोली, ट्रांसफार्मर, स्टेशन नियंत्रण कक्ष, हॉट स्टॅन्डबाय वर्किंग इलेक्ट्रिकल या विविध सुरक्षा उपकरणांची पाहणी केली. या वेळी प्रात्यक्षिक (मॉक ड्रिल) देखील आयोजित करण्यात आले. कुठल्याही संभाव्य आणीबाणी च्या परिस्थितीत करावयाच्या उपाय योजनांची समीक्षा देखील करण्यात आली.

  ऑरेंज लाईन मार्गिकेवरील उज्ज्वल नगर (८८००.००), छत्रपती चौक (१२५६८.००),काँग्रेस नगर (८१००. ००) ऍक्वा लाईन वरील धरमपेठ कॉलेज (५४२७. ०३) वर्ग मीटर क्षेत्रामध्ये मेट्रो स्टेशनची उभारणी करण्यात आली आहे. स्टेशनच्या दोन्ही (उत्तर व दक्षिण) बाजूने आगमन/निर्गमनची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. ग्राउंड लेव्हल, कॉनकोर्स लेव्हल आणि प्लॅटफॉर्म अश्या तीन मजलीच्या दुसऱ्या म्हणजेच कॉनकोर्स लेव्हलवर तिकीट काउंटर व स्टेशन कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे.

  धरमपेठ कॉलेज मेट्रो स्टेशन
  उत्तर अंबाझरी मार्गावरील धरमपेठ कॉलेज मेट्रो स्टेशन ‘अँक्वा थीम’ वर बनविण्यात आले आहे. हिंगणा मार्गावर शैक्षणिक संस्था, औद्योगिक वसाहत, मोठी बाजारपेठ असल्यामुळे या परिसरात प्रवाश्यांची नेहमीच गर्दी असते.

  कॉंग्रेस नगर मेट्रो स्टेशन
  काँग्रेस नगर मेट्रो स्टेशन अजनी रेल्वे स्टेशनशी जुळले असून भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्याना अजनी रेल्वे स्टेशन येथे उतरताच मेट्रो ट्रेनने प्रवास करता येईल. महा मेट्रोने अजनी रेल्वे स्टेशनच्या पहिल्या फ्लॅटफॉर्म येथून मेट्रो स्टेशनला जोडले आहे.ज्यामुळे नागरिकांना सहज पणे मेट्रो स्टेशन परिसरात पोहचता येईल तसेच मेट्रोचा उपयोग करून अजनी मेट्रो स्टेशन पर्यंत पोहोचून पुढील यात्रा करणे शक्य होईल. मुख्य म्हणजे अजनी रेल्वे स्टेशन येथून मोठ्या प्रमाणात नागरिक देशाच्या अन्य ठिकाणी जाण्याकरता या ठिकाणाहून प्रवास करीत असतात त्यामुळे रेल्वे प्रवाश्याना निश्चितच याचा फायदा होईल. या व्यतिरिक्त मेट्रो स्टेशन जवळ असलेल्या शाळा, कॉलेज येथील विद्यार्थ्याना करिता देखील उपयुक्त ठरेल.

  छत्रपती चौक मेट्रो स्टेशन
  छत्रपती नगर चौक बाहेर गावावरून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाश्यान करता प्रमुख केंद्र आहे. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या सुरुवातील छत्रपती नगर उड्डाणपूलच्या ऐवजी मेट्रो रेलचे पिलर निर्माण कार्यास सुरुवात झाली. छत्रपती नगर चौक परिसरात मोठ्या प्रमाणात लोक वस्ती आहे. राणा प्रताप नगर चौक ते छत्रपती चौक आणि रचना मेट्रो स्टेशन टी पॉईंट चे अंतर बहुतांश समान असल्याने विशेषकर बर्डी,गांधीबाग,रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, इतवारी आणि पूर्व, दक्षिण व उत्तर नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांन करिता दोन्ही मार्ग अनुकूल आहे.

  उज्ज्वल नगर मेट्रो स्टेशन
  छत्रपती नगर चौक प्रमाणेच उज्ज्वल नगर मेट्रो स्टेशन देखील बाहेर गावावरून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाश्यान करता प्रमुख केंद्र आहे तसेच या परिसरातून म्हणजेच मनीष नगर, बेसा, बेलतरोडी येथील नागरिकांना या मेट्रो स्टेशनमुळे मोठ्या प्रमाणात फायदा होईल. तसेच अनेक कर्मचारी मोठ्या प्रमाणात मिहान येथील कंपनी मध्ये कार्यरत असून जास्तीत जास्त नागरिकांना स्टेशन सुरु झाल्यास याचा लाभ मिळेल.

  आजच्या सीएमआरएस दौऱ्या प्रसंगी संचालक (प्रकल्प) श्री महेश कुमार, संचालक (रोलिंग स्टॉक व सिस्टीम) श्री. सुनील माथूर, संचालक(वित्त) श्री. एस. शिवमाथन, प्रकल्प संचालक (जनरल कंसलटट) श्री. रामनाथन, कार्यकारी संचालक श्री. अनिल कोकाटे, श्री. अरुण कुमार, श्री. नरेश गुरबानी, श्री.जे पी डेहरीया, श्री. राजेश पाटील, महाव्यवस्थापक श्री. सुधाकर उराडे, श्री. आशिष सांघी व इतर अधिकारी उपस्थित होते.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145