Published On : Tue, Aug 31st, 2021

मुख्यमंत्री ठाकरे यांनी हिरवा चष्मा काढावा, देवस्थाने तात्काळ सुरु करा : आ.कृष्णा खोपडे

नागपूर : महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाते. अनेक मोठी देवस्थाने या महाराष्ट्राला लाभली असून इतर राज्यात मंदिरे सुरु झालेली असताना देखील राज्य सरकारने महाराष्ट्रात मंदिरे उघडण्याची परवानगी अद्याप दिलेली नाही. मंदिराच्या भरवशावर हार-फुल, डेकोरेशन व अनेक छोट्या-मोठ्या दुकानदारांचा व्यवसाय आहे. मंदिरे बंद असल्यामुळे मागील अनेक दिवसापासून यांचेवर उपासमारीची वेळ आहे. एकीकडे सर्वच अनलॉक करताना मंदिर का उघडण्यात येत नाही, हेच कळत नाही. तेव्हा गोरगरिबांची पोटाची शिदोरी व्हावी यासाठी तरी निदान मंदिरे सुरु करण्यासाठी व सरकारला सदबुद्दी मिळावी याकरिता पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी हरिहर मंदिर येथे आरती केली. त्याच बरोबर भारतीय जनता पार्टी, पूर्व नागपूरच्या वतीने या ठिकाणी आंदोलन देखील केले.

पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले की, जेव्हापासून उद्धव ठाकरे सरकार महाराष्ट्रात आले, तेव्हापासून हिंदू संस्कृतीवर लगातार आघात करण्याचे काम या सरकारने केले आहे. या राज्यात बीअर बार, वाईन शॉप, डान्स बार सुरु होऊ शकतात तर परंतु मंदिरे उघडली तर अचानक कोरोना वाढेल कां? गोकुळाष्टमीच्या या पावन पर्वावर मंदिरे सुरु नाही. आता गणेशोत्सवाला सुरुवात होईल, नंतर नवरात्र आहे. देवस्थाने जर सुरु केली नाही तर यावर उदरनिर्वाह असणा-यांनी जगायचे कसे? देवस्थानातील पुजारी, हार-तुरे विकणारे, भजन-कीर्तन म्हणणारे, हे माणसे नाहीत कां? यांना जीवन जगण्याचा अधिकार नाही कां? सरकार यांचे उदरनिर्वाहाची जबाबदारी घेणार कां?

सत्तेच्या नादात शिवसेना आता भगवा विसरलेली आहे? कॉंग्रेस-राष्ट्रवादीने हिरवा झेंडा त्यांच्या हाती दिलेला आहे. शिवसेना आता बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही तर सत्तापिपासू नेत्याची ही सेना आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा चष्मा काढून बघितले पाहीजे. याकरिता भगवंत त्यांना सदबुद्धी देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.

यावेळी मंडळ अध्यक्ष संजय अवचट, नगरसेवक बंटी कुकडे, प्रदीप पोहाणे, मनोज चापले, मनिषा कोठे, कांता रारोकर, सरिता कावरे, अनिल गेंडरे, राजकुमार सेलोकर, निशा भोयर, सन्नी राऊत, सचिन करारे, नंदा येवले, पिंटू गि-हे, सेतराम सेलोकर, जे.पी.,शर्मा, राजू गोतमारे, सुनील सूर्यवंशी, देवेंद्र बारई, सुधीर दुबे, विनायक उईके, बाळा वानखेडे, कपिल उमाळे, मंगेश धार्मिक, नितीन इटनकर, गोविंदा काटेकर, अन्नू यादव, आशिष मेहर, शरयू, चंदा मानवटकर, पल्लवी गिरोले व अनेक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.