Published On : Wed, Apr 19th, 2017

वाहनावर लाल दिवा न लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

Advertisement

CM Devendra Fadnavis
मुंबई:
शासकीय वाहनांवरीललाल दिव्याच्या वापरावर केंद्रीय मंत्रिमंडळाने घातलेल्या निर्बंधांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले असून त्याची वैयक्तिक पातळीवर तात्काळ अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. आज पुणे दौऱ्यावर असताना या निर्णयाची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी आपल्या शासकीय वाहनावरील लाल दिवा काढून टाकण्याचे आदेश दिले.

केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी 1 मे पासून होणार असली तरी मुख्यमंत्र्यांनी आजपासूनच गाडीवर लाल दिवा वापरणे बंद केले आहे.व्हीआयपी संस्कृतीला चाप लावण्यासाठी प्रधानमंत्रीनरेंद्र मोदी यांनी उचललेल्या या महत्त्वाच्या निर्णयाचे महाराष्ट्र सरकार स्वागत करीत असूनआपणशासकीय वाहनावर लाल दिवा (RedBeacons)लावणार नाही,असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून त्याची पुणे दौऱ्यात तात्काळ अंमलबजावणीहीकेली.या निर्णयामुळे लोकशाही अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे, अशी आशाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above