Published On : Sat, Dec 15th, 2018

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी मालकी हक्काचे पट्टेवाटप

नागपूर : नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या जमिनीवरील झोपडपट्टीवासीयांना मालकी हक्काचे पट्टेवाटप व निर्वासितांना दिलेल्या मिळकतीचा सत्ताप्रकार अ-१ करून सुधारीत आखीव पत्रिकांचे वितरण रविवारी (ता. १६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

जाटतरोडी रोड, टिंबर मार्केट मोक्षधाम घाटाजवळ सायंकाळी ५ वाजता आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहतील. तर राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. सदर कार्यक्रमात सरस्वती नगर, फकीरवाडी, रामबाग, जाटतरोडी, कुंदनलाल गुप्ता वाचनालयाच्या मागील वस्ती, बोरकर नगर, बसोड मोहल्ला झोपडपट्टी, काफला वस्ती, इमामवाडा-२ या झोपडपट्टीवासीयांना मालकी हक्क पट्ट्यांचे वितरण होईल.

Advertisement

कार्यक्रमाला खासदार विकास महात्मे, आमदार नागो गाणार, आमदार प्रकाश गजभिये, आमदार जागेंद्र कवाडे, आमदार अनिल सोले, आमदार गिरीश व्यास, आमदार सुधाकर देशमुख, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार सुधाकर कोहळे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, जिल्हाधिकारी तथा नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती अश्विन मुदगल, मनपा आयुक्त अभिजीत बांगर, मनपातील बसपाचे पक्षनेते मोहम्मद जमाल, राकाँ पक्षनेते दुनेश्वर पेठे, शिवसेना गटनेता किशोर कुमेरिया, सभापती अभय गोटेकर, धंतोली झोनच्या सभापती विशाखा बांते, नगरसेवक विजय चुटेले, प्रमोद चिखले, नगरसेविका हर्षला साबळे, लता काटगाये, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे उपस्थित राहतील. सदर कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अपर आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त राजेश मोहिते, कार्यकारी अभियंता (स्लम) राजेश राहाटे, धंतोली झोनच्या सहायक आयुक्त स्मिता काळे यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement