Published On : Tue, Jun 25th, 2019

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी राष्ट्रवादी युवकचे भीक मागो आंदोलन

युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवली रक्कम;मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा…

मुंबई : बीेएमसीने मुख्यमंत्र्यांसहीत अनेक मंत्र्यांच्या बंगल्याची पाणीपट्टी थकली असल्याने डिफॉल्टर ठरवल्यानंतर ही थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आज भीक मागो आंदोलन करण्यात आले.

Advertisement

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासहीत अनेक मंत्र्यांच्या करोडो रुपयांची पाणीपट्टी थकली असल्याचा मुद्दा पकडत आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सीएसएमटीसमोर भीक मागो आंदोलन केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसहीत हे आंदोलन केले.

सीएसएमटीसमोर खाली बसून मुख्यमंत्र्यांची पाणीपट्टी भरण्यासाठी भीक मागत असल्याचे लोकांना सांगितले. त्यामुळे लोकांनी उत्स्फूर्तपणे पैसे देवू केले. ही रक्कम मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने सांगण्यात आले.

Advertisement
Advertisement
Advertisement