नागपूर: राष्ट्रीय स्वच्छता कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप के. हाथीबेड यांनी महावितरणमध्ये स्वच्छता कर्मचा-यांबद्दल असलेले धोरण, लाड-पागे समितीच्या शिफ़ारशींची अंमलबजावणी आणि कंत्राटी स्वच्छता कर्मचारी आदी विषयांचा आढावा घेण्यासाठी महावितरणच्या विद्युत भवन येथील मुख्यालयात बैठक घेतली.
या बैठकीत हाथीबेड यांनी स्वच्छता कर्मचा-यांचे पुर्नवसन, त्यांचे सामाजिक सबलीकरण, कंत्राटी स्चच्छता कर्मचा-यांचे वेतन, भविष्य निधी, आरोग्य विमा आदी विषयांवर विस्तृत चर्चा केली. या बैठकीला महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता रफ़ीक शेख, अधीक्षक अभियंता मनिष वाठ, राकेश जनबंधू, कार्यकारी अभियंता एच. पी, गिरधर, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री वैभव थोरात, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे, उप विधी अधिकारी स्म्दीप केणे यांचेसोबत सामाजिक प्रतिनिधी सुभाष नंदनवार, पी. आर. खोटे, डॉ. अनिल बघेल, पी.सी. देवतळे, पी.डी. पाथे आदी उपस्थित होते.
फ़ोटो ओळ – राष्ट्रीय स्वच्छता कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप के. हाथीबेड यांचे स्वागत करतांना मुख्य अभियंता रफ़ीक शेख.
