
20 महा. बटालीयन एन.सी.सी. युनिट, धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर यांच्या कडून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आज दि. ०१ ओक्टोंबर ला सकाळी १०.०० वाजता एक तास अजणी रेल्वे स्टेशन येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. याकरिता 20 महा. बटालीयन एन.सी.सी.चे कमाडिंग ऑफिसर कर्नल मनुज मुजूमदार व डी एन सी चे प्राचार्य डॉ ओ एस देशमुख यांच्या मार्गदर्शनात सर्व प्रथम धनवटे नॅशनल कॉलेज येथून स्वच्छता जन जागृती रॅली ची सुरुवात झाली व अजणी रेल्वे स्टेशन येथे पोहचून संपूर्ण रेल्वे स्टेशन ची साफ सफाई करण्यात आली. याप्रसंगी रेल्वेचे डी.एम.ओ. कृष्णणाथ पाटील, स्टेशन व्यवस्थापिका माधुरी चौधरी, धनवटे नॅशनल कॉलेजचे एन सी सी ऑफिसर कॅप्टन डॉ सुभाष दाढे, 20 महाराष्ट्र बटालियनचे सुभेदार मेजर कुंदन सिंग, नायब सुभेदार जसविनदर, हवालदार मेवा सिंग, हवालदार हरबजन सिंग सह धनवटे नॅशनल कॉलेज, आंबेडकर कॉलेज, व्ही एम व्ही कॉलेज, एस बी सीटी कॉलेज, कमला नेहरू कॉलेज, सी पी एण्ड बेरार कॉलेज चे एकूण २५० कडेट्सनी स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला.









