Published On : Mon, Aug 5th, 2019

पोरवाल महाविद्यालयात स्वच्छता पखवाडा संपन्न

कामठी : -सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय कामठी येथे नेहरू युवा केंद्र नागपूर व युवा चेतना मंच तसेच सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वच्छता पंधरवाडा कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 2 ऑगस्ट 2019 ला पोरवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी. बागडे यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले .

या प्रसंगी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक उदय विर सिंह हे प्रामुख्याने उपस्थित होते ,प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. पराग सपाटे उपस्थित होते .अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉक्टर बागडे यांनी युवकांनी सदैव स्वच्छतेचे पालन करावे यासंबंधी माहिती दिली, मार्गदर्शन म्हणून प्रा. पराग सपाटे यांनी पर्यावरण व स्वच्छता या विषयावर मार्गदर्शन केले, युवकांनी पर्यावरण सुरक्षेसाठी समोर यावी यावर याचे आव्हान केले .तर नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक उदयविर सिंह यांनी नेहरू युवा केंद्राच्या कार्य व स्वच्छता संबंधी जलसमस्या वायू समस्या यावर मार्गदर्शन केले .

तर भारत सरकारच्या ग्रीष्मकालीन स्वच्छ भारत इंटरंशिप अभियानात अंतर्गत नुकतेच 100 तास पूर्ण करणारे विनोद कोहळे यांनी स्वच्छतेचे दुष्परिणाम यावर माहिती सांगितली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वच्छते सबधी शपथ घेतली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजय कापसे, नरेंद्र ठाकरे, उमेश कनोजिया ,प्रणय वैद्य, कल्याणी डोरले ,निकिता गायधनी, अश्विनी ढवळे, प्राची वानखेडे, पूजा सहारे ,तनु उके, प्रतीक्षा ठोक ,आदींनी सहकार्य केले

संदीप कांबळे कामठी