Published On : Tue, May 23rd, 2017

५ जून पूर्वी नदी-नाल्यांची स्वच्छता पूर्ण करा : अश्विन मुदगल

Advertisement


नागपूर:
आपत्ती ही कुठेही, कधीही येऊ शकते. उलट जिथे कमी तयारी असते तिथेच आपत्ती येते असा अनुभव प्रत्येकाला येतो. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच नदी, नाल्यांची स्वच्छता पूर्ण करण्यात यावी तसेच शहरातील तलावांच्या पाण्याची पातळी १ जून पासूनच दररोज तपासून त्याची माहिती ग्रुपवर टाकण्याची सूचना मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी केली.

सोमवार २२ मे रोजी मनपा मुख्यालयात नैसर्गिक आपत्ती-मानसून २०१७ पूर्वतयारी आढावा बैठकीत त्यांनी वरील दिशानिर्देश जारी केले. याप्रसंगी अपर आयुक्त डॉ.रामनाथ सोनवणे, आर.झेड. सिद्दीकी, रवींद्र कुंभारे, मुख्य अभियंता उल्लास देबडवार, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, अधीक्षक अभियंता (जलप्रदाय विभाग) मनोज तालेवार, अधीक्षक अभियता (सार्वजनिक बांधकाम विभाग) दिलीप जामगडे, नद्या व सरोवराचे मोहम्मद ईजराइल, प्रमुख अग्निशम अधिकारी राजेंद्र उचके, उद्यान अधीक्षक सुधीर माटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, आणीबाणी विभागाचे सुनील राऊत, शिक्षणाधिकारी फारुख अहमद, कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी. जांभूळकर, कार्यकारी अभियंता (पेंचप्रकल्प) अनिरुद्ध चौगंजकर, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैसवाल, कार्यकारी अभियंता राजेश भूतकर, कार्यकारी अभियंता कुकरेजा, कांती सोनकुसरे, सतीश नेरळ तसेच सर्व दहाही झोनचे सहायक आयुक्त उपस्थित होते. बैठकीत आयुक्त अश्विन मुदगल यांनी शहरातील सीमेंट रोडची तपासणी करुन खोलगट भागात पाणी साचणार नाही याची आधीच दक्षता घेण्याची सूचना केली. पावसाळ्यात साचलेल्या पाण्याचा तातडीने उपसा करण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री सुसज्ज ठेवण्यासोबतच पावसाळ्यात तुंबणारे ड्रेनेज आधीच मोकळे करुन ठेवण्याची सूचना आयुक्तांनी केली.

शहरातील जीर्ण इमारती, धोकादायक इमारती, अतिधोकादायक इमारती किती आहेत, किती पाडण्यात आल्या या विषयीचा आढावा बैठकीत आयुक्तांनी घेतला. नदी-नाल्यांच्या काठी राहणाऱ्या लोकांना तसेच ज्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये वारंवार पाणी साचण्याची समस्या आहे त्यांना नोटीस जारी करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. पावसाळ्यापूर्वी शाळांची तपासणी पूर्ण करुन कोणत्या शाळेत पाणी गळतीची समस्या आहेत, शाळांमधील शौचालयांची स्थिती तपासून शाळा सुरु होण्यापूर्वीच दुरुस्त करण्याची सूचना केली. अग्निशमन विभागाला सूचना देताना आयुक्त अश्विन मुदगल यांनी सर्व बोटी सुस्थितीत ठेवण्याचे निर्देश दिले.

Gold Rate
05 May 2025
Gold 24 KT 93,900/-
Gold 22 KT 87,300/-
Silver/Kg 95,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अग्निशमन विभागासाठी आपत्तीकाळात लागणारे होमगार्ड तसेच वाहनचालक याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन इतर विभागांकडून तात्पुरती सेवा घेण्याचे दिशानिर्देश दिले. याशिवाय इमरजेंसी लाईट्स, फ्लड लाईट्स तसेच प्रत्येक झोनमध्ये पंप सुस्थितीत ठेवण्याची सूचना केली. आपत्तीकाळात समन्वयाशिवाय पर्याय नाही, असे सांगून अग्निशमन विभागाने झोन अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याची सूचना केली. सर्वच झोनस्तरावरील तसेच मनपा मुख्यालयातील कंट्रोल रुम १ जून पासून २४ तास सुरु ठेवण्याचे सांगून, वादळ आल्याने झाडे उन्मळून पडल्यास तातडीने ती उचलण्यासाठी १० टीम सुसज्य ठेवण्याची सूचना उद्यान विभागाला दिली.

इलेक्ट्रिक विभागाने आपातकालीन व्यवस्था चोख ठेवावी तसेच अशा भागात जेथे तिन्ही नद्यांचा संगम होतो त्या ठिकाणी तसेच शहरातील खोलगट भाग जेथे दर पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या उदभवते उदा. लक्ष्मी नगर, पडोळे ले आऊट, नरेंद्र नगर पूल, रहाटे कॉलनी, हिंगणा नाका इत्यादी अश्या ठिकाणांसाठी पर्यायी व्यवस्था करुन ठेवण्याची सूचना आयुक्त अश्विन मुदगल यांनी बैठकीत केली.

Advertisement
Advertisement