Published On : Wed, Feb 18th, 2026
By Nagpur Today Nagpur News

टिपू सुलतान’ विधानावरून निर्माण झालेल्या वादावर स्पष्टीकरण;हर्षवर्धन सपकाळ यांची दिलगिरी

Advertisement

मुंबई : टिपू सुलतानला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितले पाहिजे’ या माझ्या विधानाचा विपर्यास करून काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर त्याबद्दल मी मनःपूर्वक खेद व्यक्त करतो,” अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडली आहे.

टिपू सुलतान संदर्भातील त्यांच्या वक्तव्यावरून राज्यात राजकीय वाद उसळल्यानंतर त्यांनी ‘एक्स’ या माध्यमातून स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली. “माझ्या शब्दांचा गैरवापर करण्यात आला. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता,” असे त्यांनी नमूद केले.

Gold Rate
Apr 15 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,54,400 /-
Gold 22 KT ₹ 1,43,600 /-
Silver/Kg ₹ 2,56,300/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

वादाची ठिणगी कशी पडली?
मालेगाव महापालिकेच्या उपमहापौरांनी आपल्या दालनात टिपू सुलतान यांचे छायाचित्र लावल्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला. यावर प्रतिक्रिया देताना सपकाळ यांनी केलेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे.

या प्रकरणावरून Bharatiya Janata Party ने राज्यभर निषेध आंदोलन छेडले होते.

‘शिवाजी महाराजांशी तुलना नाही’
सपकाळ म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. ते माझे आदर्श, प्रेरणास्थान आणि स्वाभिमान आहेत. त्यांच्याशी तुलना करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.”

त्यांनी स्पष्ट केले की, “टिपू सुलतानने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इंग्रजांविरुद्ध लढा दिला, एवढेच मी म्हटले होते. मात्र माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून चुकीचा अर्थ लावण्यात आला.”

बंधुभाव आणि संयत चर्चा हवी-
इतिहासावर मतभेद असू शकतात; मात्र त्यावर संयत, अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी आणि समाजात तणाव निर्माण होऊ नये, हीच माझी भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. जात-धर्मावर ध्रुवीकरण करून वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement