Published On : Sun, Sep 3rd, 2017

आज येणार शहर पोलिसांची ‘प्रोग्रेस रिपोर्ट’

Nagpur-Police-1
नागपूर:
शहरातील नागरिकांना पोलिसांकडून काय-काय अपेक्षा आहेत आणि ते पोलिसांच्या कामापासून किती प्रमाणात संतुष्ट आहेत याबाबत जाणून घेण्यासाठी पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्या आदेशावर एक सर्व्हे करण्यात आला. मॅनेजमेंट कॉलेजतर्फे करण्यात आलेल्या या सर्व्हेमध्ये पोलिस नागरिकांच्या अपेक्षांवर कितपत यशस्वी ठरली याचा खुलासा होणार आहे.

रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पोलिसांची ‘प्रोग्रेस रिपोर्ट’ सादर करण्यात येईल. आयुक्त व्यंकटेशम यांनी सांगितले की, जर एखादे काम केले जात आहे तर त्याचे आकलन होणे आवश्यक आहे. जर नागरिकांनी प्रशंसा केली तर हे आमचे यश आहे आणि जर यात काही कमतरता असेल तर आम्ही निश्चितच त्यात सुधारणा करू. आयुक्तांनी सांगितले की, एप्रिल महिन्यात त्यांनी तिरपुडे इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला हा सर्व्हे करण्याची जबाबदारी सोपविली होती. याबाबत त्यांच्यासह केळव संयुक्त आयुक्त शिवाजी बोडखे यांनाच माहिती होती.

मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी शहरातील वेगवेगळ्या ठाण्यांतर्गत जाऊन प्रत्येक वर्गातील 5500 नागरिकांचे मत जाणून घेतले. जागरुकता, पोलिसांना मदत करण्याची तयारी, संपर्क क्षमता, कार्यात्मक परिणामकारकता, पोलिसांचा व्यवहार, नागरिकांमध्ये पोलिसांची छवी, महिला सुरक्षा, वरिष्ठ नागरिकांची सुरक्षा अाणि वाहतूक व्यवस्था अशा 9 मुद्द्यांवर नागरिकांचे मत घेण्यात आले. 23 फॅकल्टी मेंबरसह 170 विद्यार्थ्यांनी यावर काम केले. रविवारी दुपारी 12 वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा अहवाल सादर करण्यात येईल. आयटी पार्कच्या पर्सिस्टंट हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आयुक्तांनी पोलिसांतर्फे चालविण्यात आलेल्या उपक्रमांची माहितीही दिली.