Published On : Tue, Sep 29th, 2020

CITU तर्फे संविधान चौकात आशा वर्कर्स चे चेतावणी आंदोलनं

Advertisement

नागपुर – ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी, ही योजना पूर्ण करण्याची जिम्मेदारी आशा वर्कर्सांवरील सोवपली आहे. आशा सोबत आरोग्य कर्मचारी, स्वयंसेविका, स्वयंसेवक ठेवण्याची जिम्मेदारी आहे. लोक प्रतिनिधी कडून १०० रुपये रोज प्रमाणे स्वयंसेवक नेमणुकीचा प्रस्ताव असून सुद्धा लोक प्रतिनिधींना माहिती नाही. सहयोगी न देता फक्त आशा वर्कर्स वर पूर्ण कामाचा भार टाकण्यात येत आहे.

शहरी भागात तर ए एन एम, सूपर वायजर, म न पा कर्मी किंवा अधिकारी राजीनामा दया किंवा काढून टाकू. मेल्यानंतर ५० लाख मिळणार आहेत अशी भाषा वापरून ताकीद देण्यात येत आहे. बरोबर सेनिटायजर,हात मोजे,फेस मास्क, कॅप, प्रिंटेड टी शर्ट किंवा अँप्रोन कालावधी संपून सुद्धा उपलब्ध झाले नाही. आणखी पुढे करा पण पैसे मिळणार नाही.असे शहरी भागात धमकावण्यात येत आहे.

२२ मार्च पासून कोरोंना काम करणाऱ्या आशा वर्कर्स व डाटा एन्ट्री करणाऱ्या गटप्रवर्तक याना काम करून सुद्धा कोणताही मोबदला मनपा किंवा जिल्हा परिषद यांनी वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा दिला नाही किंवा युनियन प्रतिनिधी सोबत कोणत्याही जिम्मेदार अधिकाऱ्यांनी चर्चा सुद्धा केली नाही. त्यामुळे जिल्हा स्तरावर काम बंद आंदोलन करावे. अशी भूमिका घेतली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ईतर काही जिल्ह्यात २०० रू. रोज ते ३५० रू. रोज जिल्हा प्रशासन देत आहे. प्रशासनाला पत्राद्वारे सुचित करण्यात येत आहे किं, सोमवार दि. ५ ऑ्टोबरपर्यंत योग्य निर्णय घ्यावा अन्यथा ५ ऑ्क्तोंबर पासून नागपूर जिल्ह्यात काम बंद आंदोलन करावे लागेल. अध्यक्ष राजेंद्र साठे व महासचिव प्रीती मेश्राम आणि रंजना पौनिकर व आशा व गट प्रवर्तक कर्मचारी युनियन नागपूर. यावेळी उपस्थित होते.