Published On : Tue, Mar 31st, 2020

नागरिकांनी रक्तदान करून आपत्ती निवारणासाठी सहकार्य करावे:-माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर

कामठी :-कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील कमी होत असलेल्या रक्ताच्या साठ्याबाबत राज्याच्या रक्तपेढीत तुटवडा निर्माण झाला आहे तेव्हा भविष्यात रक्ताचा तुटवडा जाणवू नये यासाठी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस चे महासचिव व नागपूर जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर यांच्या नेतृत्वात कामठी तालुक्यातील येरखेडा व केम येथे महाराष्ट्र प्रदेश तसेच तालुका युवक कांग्रेस च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून शेकडोच्या वर संख्येतील तरुणांनी स्वेच्छेने रक्तदान केले .

याप्रसंगी नागरिकांनी रक्तदान करून आपत्ती निवारणासाठी सहकार्य करावे असे आव्हान सुद्धा सुरेशभाऊ भोयर यांनी केले.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या प्रा.अवंतिका ताई लेकुरवाळे,माजी जी प सदस्या.सरिता ताई रंगारी, महाराष्ट्र युवक काँग्रेस चे सचिव.इर्शाद शेख , पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी , केम ग्रामपंचायत चे उपसरपंच अतुल बाळबुधे प्रामुख्याने उपस्थित होते. येरखेडा येथील तक्षशिला बुद्ध विहारात पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी तर केम गावात उपसरपंच अतुल बाळबुधे यानो रक्त दान शिबीर चे आयोजन केले होते.

संदीप कांबळे कामठी