कन्हान : – नगरपरिषद कन्हान-पिपरी अंतर्गत शहरा तील लोकवस्तीत, रस्त्यावर व महामार्गा सह प्रमुख रस्त्यावर मोकाट गाई, म्हशी, कुत्रे, डुकरे व इतर जना वरांच्या मुक्त संचाराने शासकीय कार्यालय, एटीएम, लोक वस्तीच्या घरात ही जनावरे घुसुन नागरिकांचे चांगलेच नुकसान करित आहे. तसेच शहरातील रस्ते, प्रमुख रस्त्यावर व राष्ट्रीय महामार्गावर जनावरांचे कळप ठिय्या आंदोलन करित बसुन व फिरत असल्या ने ये-जा करणा-या वाहन, वाहनचालकाचा अपघात होणे नित्याचेच झाले असुन सुध्दा नगर प्रशासन अधि कारी मुक दर्शकांची भुमिका बजावित असल्याने नगर परिषद प्रशासना विरोधात नागरिकांत रोष उफाळत आहे.
मागील अनेक दिवसांपासुन नगरपरिषद कन्हान -पिपरी अंतर्गत शहर परिसरात मोकाट गाई, म्हशी, कुत्रे, डुकरे व इतर जनावरांचा मुक्तसंचार दिवस-रात्र वाढु लागल्याने कन्हान शहरवासी नागरिक व वाहन चालकांना अपघाताला बळी पडुन भयंकर त्रास सहन करावा लागत आहे. या मोकाट जनावरांची जत्रा रस्ता रस्त्यावर लागत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्मा ण होत अपघातास निमत्रण देत आहे. तरी सुध्दा नगर परिषद प्रशासन या जिवघेण्या समस्येकडे डोळे लावुन पाहत असल्याने शहरवासी आश्चर्य व्यक्त करीत आहे . शासकीय कार्यालय जसे पोलीस स्टेशन, कन्हान-पिपरी नगरपरिषद जुनी व नविन इमारत, रेल्वे स्टेशन, बँक, एटीएम येथे कुत्र्यांचा उपद्रव होत कधी कधी नागरिकांच्या मागे धावत चावा घेत जख्मी करत आहे.
शहराच्या लोकवस्तीतील नागरिकांच्या घरात कुत्रे, डुकरे, जनावरे प्रवेश करून शोभिवंत झाडे, सामानाची नासधुस करित आहे. काही ठिकाणी मोठय़ा प्रमाणात असलेली कुत्रे, डुकरे नागरिकांच्या घरात प्रवेश करून लहान मुलांना नुकसान पोहचवित आहे. तर रस्त्यावर गाई-ढोराचे गोहन तळ मांडून बसत असल्याने वाहन चालकांचे अपघात होण्याच्या घटना नित्याचिच बाब झाली आहे. तसेच रस्त्यालगत मोकाट कुत्र्याचे कळप दुचाकी, चारचाकी वाहनाच्या मागे धावत असल्याने अपघात होऊन वाहन व वाहन चालकाना भंयकर त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीला मोकाट कुत्रे जोर जोरात भुकत असल्याने नागरिकाची झोप मोड होऊन रात्रीला आराम करणे सुध्दा कठीण झाले आहे . जेव्हा शासकीय कार्यालयाच्या आवारात वर्दळी च्या स्थळावरील या मोकाट कुत्रे, डुकरे जनावरांच्या धुमा कुळीवर नियंत्रण नाही तर मग शहरातील लोकवस्ती त लक्ष देणार तरी कोण ?
कन्हान-पिपरी नगरपरिषद पदाधिकारी, अधि कारी, नगरसेवकांच्या उदासिनतेने “आंधळा दळतो, कुत्रा पिठ खातो ” या म्हणी प्रमाणे येथील समस्या सोडवण्यात नगरपरिषद प्रशासन कुचकामी ठरत असल्याचे दिसुन येते. मोकाट कुत्रे, डुकरांची संख्या दिवसेदिवस वाढत असल्याने शहरात घाणीचे साम्रा ज्य दिवसागणिक वाढत असुन रोगराईला आमंत्रण दिले जात आहे. अशा मोकाट जनावरांच्या मालकावर कारवाई होत नसल्याने पशुमालक आपली जनावरे बिनधास्तपणे मोकाट शहरात सोडत आहे. या प्रकारा ला एक प्रकारे नगरपरिषद प्रशासन अधिकारी, जन प्रतिनिधी यांची जणु मुक सहमती असल्याने मोकाट जनावरांच्या धडपकडी करिता नगरपरिषद प्रशासन उदासीन दिसत आहे.