Published On : Fri, Aug 23rd, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात कोलकाता प्रकरणाचा दाखला देत तरुणीशी गैरवर्तन करणाऱ्या ऑटोचालकाला चोप!

नागपूर: राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर वर आला आहे. दोन दिवसांपूर्वी नागपुरात ऑटोमध्ये बसून लकडगंज भागातून पारडीला जात असताना एका तरुणीशी ऑटोचालकाने गैरवर्तन केल्याची घटना समोर येत आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या कोलकाता येथील आर. जी. कर हॉस्पीटल आणि मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून संतापाची लाट उसळली आहे. याच घटनेचा दाखला देत ऑटोचकाने तरुणीला धमकी देण्यास सुरुवात केली.

Gold Rate
24 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,23,400 /-
Gold 22 KT ₹ 1,14,800 /-
Silver/Kg ₹ 1,51,600/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

हा वाद चिघळल्या नंतर हिम्मतीने तरुणीने ऑटो थांबवित आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे स्थानिक नागरिक जमले आणि तरुणीने ऑटोचालकाच्या गैरवर्तनाविषयी नागरिकांना माहिती दिली.

त्यांनतर नागरिकांनी ऑटोचाकाला चांगलाच चोप देत त्याला पारडी पोलिसांच्या स्वाधीन केले.

Advertisement
Advertisement