Published On : Wed, Dec 25th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूरसह देशभरात ख्रिसमस सणाचा उत्साह !

Advertisement

नागपूर : ख्रिश्चन धर्मीयांसाठी ख्रिसमस हा फार महत्त्वाचा सण असतो. मराठी भाषेत ‘ख्रिसमस’ला नाताळ म्हणून सुद्धा ओळखला जातो. भारतातच नव्हे तर, परदेशातही लोक हा सण साजरा करतात. दरवर्षी हा सण २५ डिसेंबरला साजरा केला जातो. येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. येशूंनी संपूर्ण समाजाला प्रेम व मानवतेची शिकवण देणारे येशू हे ख्रिस्ति धर्माचे संस्थापक मानले जातात. येशू ख्रिस्त यांचा जन्म बेथलेहेम शहरात झाला.

‘क्राइस्ट्स मास’ अर्थात येशुच्या जन्मानिमित्त करण्यात येणारी सामूहिक प्रार्थना. ख्रिस्ती लोकांसाठी हा सण आनंदाचा आणि हर्षाचा सण आहे, जशी पौर्णिमा व अमावस्या या तिथी जश्या चंद्रावर अवलंबून असतात. तसा प्रकार ख्रिस्ति कालगणनेत नाही, ख्रिस्ति कालगणेत सूर्याला अधिक महत्व दिले जाते. दिवशी चर्च आणि दुकाने तसेच आपली घरे सुंदर रोषणाई सजविले जातात, ख्रिसमस ट्री उभारून त्यास सजविले जाते. ख्रिसमस ट्री हे मंगल कामनेचे प्रतीक मानले जाते, नाताळचा दिवशी मध्यरात्री Santa हा लहान मुलास भेट वस्तू देतो असा समज आहे. सांता क्लॉज़ हि काल्पनिक वक्तिरेखा असून त्याला मराठी नाताळबाबा असे म्हटले जाते. सांता क्लॉज़ हे नाताळ या सणाचे प्रमुख वैशिट्य आहे. या दिवशी काही भाविक उपवास करतात आणि सणानिमित्त घरोघरी केक चॉकलेट, बिस्कीट असे पदार्थ बनविले जातात. ख्रिस्ति धर्माचे लोक या सणाची तयारी १० दिवस अगोदर पासूनच सुरु करतात, बाजारातून नवीन कपडे, नवीन वस्तू खरेदी तसेच आपल्या घरातील साफसफाई करणे, आणि गोड पदार्थ बनवण्यास सुरु करतात. २४ डिसेंबरच्या रात्रीपासून येशूची प्रार्थना करण्यास सुरवात केली जाते. २५ डिसेंबर ला येशूचा जन्म दिवस साजरा केला जातो.

ख्रिश्चन बांधव नाताळच्या आगमना अगोदर पासूनच प्रार्थना व कॅरॉल्सच्या गायनास सुरूवात करतात. शिवाय, नाताळच्या दिवशी सर्व ख्रिस्ति धर्माचे लोक नवीन कपडे घालून उत्साहाने चर्च मध्ये जातात आणि येशूला प्रार्थना करतात.या दिवशी सर्व ख्रिश्चन बांधव एक दुसऱ्याची गळा भेट घेऊन शुभेच्या देतात.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement