Published On : Fri, Nov 15th, 2019

धर्मराज विद्यालय व कनिष्ठ महा विद्यालयात बालकदिन साजरा

Advertisement

कन्हान : – पं. जवाहरलाल नेहरू यांची जयंती ” बालकदिन ” म्हणुन धर्मराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कांद्री- कन्हान येथे निबंध व कथा-कथन स्पर्धेचे आयोजन करून साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पमिता वासनिक, प्रमुख अतिथि म्हणून उपमुख्याध्यापिक अनिता हाडके, पर्यवेक्षक रमेश साखर कर, जेष्ठ शिक्षक सुरेंद्र मेश्राम, सुनील लाडेकर प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवारांच्या हस्ते पं.जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पुजन करून कथा, कथन व निबंध स्पर्धेचे परिक्षक म्हणुन अनिल मंगर, अनिरुद्ध जोशी, धर्मेन्द्र रामटेके यांनी काम बघितले.

या स्पर्धेत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालया च्या विद्यार्थ्यांनी स्वयंफुर्त सहभाग घेत बालक दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्र माचे सुत्रसंचालन अनिल सारवे सर यानी तर आभार प्रदर्शन सुनील लाडेकर सर यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांना खाउचे वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता हरीश केवटे, प्रकाश डुकरे, संतोष गोन्नाडे, हरिश्चंद्र इंगोले, विलास डाखोळे, राजुसिंग राठोड सह सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.