Published On : Thu, May 28th, 2026
By Nagpur Today Nagpur News

मुख्यमंत्र्यांचा संदेश पोहोचला; बडा नेता उद्या जरांगेंच्या भेटीला; मराठा आरक्षणावर तोडगा निघणार?

Advertisement

जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 30 मेपासून आमरण उपोषणाची घोषणा केल्यानंतर सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याची महत्त्वाची माहिती दिली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, ते सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कात आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या प्रश्नाबाबत सकारात्मक असून मागील काही दिवसांत सरकारने केलेल्या हालचालींची माहितीही जरांगेंना देण्यात येणार आहे.

Gold Rate
July 20 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,400 /-
Gold 22 KT ₹ 1,32,100 /-
Silver/Kg ₹ 2,20,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

“मी सातत्याने मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहे. माझे सहकारी प्रसाद लाड देखील संपर्कात आहेत. उद्या जरांगे पाटील यांची भेट घेऊन गेल्या दोन-तीन दिवसांत सरकार स्तरावर काय प्रयत्न झाले, याची माहिती देणार आहे,” असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अंतरवली सराटीत पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रसाद लाड यांच्या भेटीनंतरही आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

Advertisement

“30 मे रोजी मी आमरण उपोषणाला बसणार आहे. यावेळी मंडप नसेल, सावली नसेल. मे महिन्याच्या कडक उन्हात बसणार आहे. मेलो तर मेलो, पण आता मागे हटणार नाही,” असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

तसेच, “कोणत्याही समाजबांधवांनी अंतरवली सराटीकडे येऊ नये,” असे आवाहनही त्यांनी केले. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघाले आहे.

आता उद्या होणाऱ्या विखे पाटील आणि जरांगे यांच्या भेटीत काय चर्चा होते, सरकार कोणता तोडगा काढते आणि उपोषणाबाबत जरांगे काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Advertisement
nagpur student protest delhi lathi charge

nagpur student protest delhi lathi charge

प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews  #CrimeNews  #LatestNews #news #Attack #newsupdate

प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #news #Attack...

चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews  #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery

चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery

लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews #newsupdate

लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews...

कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug #NDPS #Crime #latestnews #news

कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug...

नागपुर में अन्ना गैंग का आतंक! NagpurNews #AnnaGang #Theft #Crime  #CCTV #LatestNews #newsupdate

नागपुर में अन्ना गैंग का आतंक! NagpurNews #AnnaGang #Theft #Crime #CCTV #LatestNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges