Published On : Fri, Jul 12th, 2019

सर्वजन सुखाय प्रदर्शनाला मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

Advertisement

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या उपक्रमास वारकऱ्यांचा प्रतिसाद

पंढरपूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने येथे आयोजित ‘कृषी पंढरी’ कृषी प्रदर्शनात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे प्रदर्शन उभारण्यात आले आहे. या प्रदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट दिली.

Advertisement

यावेळी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, आमदार प्रशांत परिचारक, बबनदादा शिंदे, सुधाकरपंत परिचारक, पुणे विभागाचे उपसंचालक मोहन राठोड, सोलापूरचे जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, प्रदर्शनाच्या समन्वयक तितीक्षा राजपूत उपस्थित होत्या.

या प्रदर्शनात शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती शेतकरी-वारकऱ्यांना व्हावी यासाठी सचित्र फलक लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या माहिती फलकांची पहाणी केली. प्रदर्शनाला किती शेतकऱ्यांची भेट दिली, याची माहिती त्यांनी घेतली. तसेच कोणत्या योजनांच्या माहिती फलकाजवळ शेतकरी-वारकरी अधिक वेळा भेट देतात याची माहिती घेतली. त्यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

प्रदर्शनात चांदीचे नाणे जिंकण्याची संधी

या प्रदर्शनात उभारण्यात आलेल्या विविध विभागांच्या कल्याणकारी योजनांच्या माहितीवर आधारित प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शन पाहून झाल्यावर 7498888877 क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यावर फोन करणाऱ्याला पुन्हा फोन येतो. त्याव्दारे तीन प्रश्न विचारण्यात येतात. बरोबर उत्तर देणाऱ्या पहिल्या दहा विजेत्यांना दहा ग्रॅमचे चांदीचे नाणे देण्यात येते. तसेच उर्वरीत विजेत्यांना विविध बक्षीसे देण्यात येतात. अवघ्या काही वेळात एक हजारहून अधिक जणांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement