नागपूर – पारडी परिसरात झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. त्यांनी पारडी येथील भवानी रुग्णालयात जाऊन उपचार सुरू असलेल्या जखमींशी संवाद साधत त्यांना धीर दिला.
नागपूर शहरातील गजबजलेल्या पारडी भागातील शिवनगर वस्तीत १० डिसेंबर रोजी बिबट्या घरांमध्ये घुसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या हल्ल्यात एकूण सात नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर भवानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी जखमींना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा करून उपचारात कोणतीही हलगर्जीपणा होऊ नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या. शासनाकडून आवश्यक ती मदत दिली जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Advertisement









