Published On : Thu, Jul 19th, 2018

‘तीर्थ विठ्ठल’ कार्यक्रमामुळे पंढरीचे वातावरण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Advertisement

नागपूर : अधिवेशनाच्या धावपळीतही ‘तीर्थ विठ्ठल’ हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे येथे पंढरीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या वतीने आयोजित ‘तीर्थ विठ्ठल’कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाचे आयोजन केल्याबदद्ल श्री. शेलार यांचे मुख्यमंत्री यांनी अभिनंदन करुन पांडुरंगाची कृपा राज्यावर राहावी, अशी प्रार्थना केली. मुख्यमंत्री यांच्या हस्ते विठ्ठल मूर्तीला पुष्प अर्पण करण्यात आले. त्यानंतर श्री. शेलार यांच्या हस्ते मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना विठ्ठलमूर्ती भेट देण्यात आली. यावेळी श्री. शेलार यांनी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांचाही सत्कार केला.

मुख्यमंत्री यांच्या हस्ते गायक राहुल देशपांडे आणि निरूपणकार डॉ. संजय उपाध्ये यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार सर्वश्री आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, भाई जगताप यांनी विठ्ठलमूर्तीची पूजा करून दीपप्रज्ज्वलन केले.

यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर आदी उपस्थित होते.