Published On : Fri, Jul 20th, 2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमीत्य प्राविण्यप्राप्त विद्यार्थी सन्मानित

नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त प्रभाग क्र. २६ मधील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना आमदार कृष्णा खोपडे यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला विदर्भ प्रदेशचे संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, प्रा. प्रमोद पेंडके, मंडळ अध्यक्ष महेंद्र राऊत, परिवहन सभापती बंटी कुकडे, नगरसेविका मनीषा कोठे, समिता चकोले, निरीक्षिका संध्या ठाकरे, प्रा. हर्षद घाटोळे, योगेंद्र शाहू, संत गोरा कुंभार समाज भवन समितीचे अध्यक्ष राजु खरे, प्रभाग २६ अ चे अध्यक्ष राजेश संगेवार, प्रभाग २६ ब चे अध्यक्ष प्रदीप निनावे, डॉ.हरीश राजगीरे, सैतराम सेलोकर प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक व विधी समितीचे सभापती ॲड धर्मपाल मेश्राम यांनी केले.

यावेळी प्रभागातील दहावी व बारावीमध्ये प्राविण्यश्रेणीत उत्तीर्ण झालेल्या सुमारे २०० गुणवंत विद्यार्थ्यांना पालकांसह गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सुरेश बारई, विलास कुराडे, रितेश तांगडे, विनोद बांगडे, विनोद कुट्टे, भुपेंद्र अंधारे, शिला वासमवार, सुनील आग्रे, दिनेश येवले, कल्पना सारवे, संगीता मोहरकर, कृष्णराव देशमुख, चंद्रशेखर पिल्ले, नारायणसिंह गौर, हिरालाल कमाले, मोनाली काथवटे, अभिजीत ठाकरे, मीनल चरपे, शेख मेहबूब, अशोक लेदे, रमेश दोनाडकर, किशोर धकाते, राम सामंत, सचिन भगत, प्रविण जगताप, लकी वराडे,संगीता कामडे आदींनी सहकार्य केले.