Published On : Tue, Jun 5th, 2018

‘निरंतर वैद्यकीय प्रशिक्षण’ वेबपोर्टलचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

Advertisement

मुंबई: महाराष्ट्र शासन आणि वैद्यकीय परिषदेने संयुक्तपणे तयार केलेल्या ‘निरंतर वैद्यकीय प्रशिक्षण’ अर्थात सीएमई (कंटिन्युअस मेडिकल एज्युकेशन) वेबपोर्टलचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयातील परिषद सभागृहात झाला.

यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे, कार्यकारी सदस्य डॉ. गोपछुडे, डॉ. विंकी रुग्वानी, प्रबंधक संजय देशमुख आदी उपस्थित होते.

शासनाच्या डिजिटल क्रांतीच्या अनुषंगाने राज्यातील नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना या वेबपोर्टलचा लाभ होणार आहे. शिवाय ग्रामीण भागातील डॉक्टरांना घरबसल्या किंवा त्यांच्या क्लिनिकमध्ये मोबाईल किंवा संगणकाच्या सहाय्याने सीएमई कार्यशाळांमध्ये सहभाग नोंदविता येणार आहे. सराव करणाऱ्या डॉक्टरांना रुग्णावर विविध आजारांवर योग्य उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर ऑनलाईन माहिती देणार आहेत.