Published On : Sun, Mar 4th, 2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बुलडाणा येथील गद्रे वाचनालयास सदिच्छा भेट

बुलडाणा : येथील गद्रे सार्वजनिक वाचनालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ परिवहन, जलसंसाधनमंत्री नितीन गडकरी यांनी आज सदिच्छा भेट दिली.

यावेळी कृषिमंत्री तथा पालकमंत्री पांडुरंग फुंडकर, गृह राज्यमंत्री रणजीत पाटील, आमदार सर्वश्री संजय कुटे, आकाश फुंडकर, चैनसुख संचेती, हर्षवर्धन सपकाळ, जिल्हा परिषद अध्यक्षा उमाताई तायडे, बुलडाणा नगर पालिकेच्या नगराध्यक्षा नजमुन्नीसा सय्यद, अध्यक्ष केशवराव एकबोटे, सचिव उदय देशपांडे, ग्रंथपाल नेमीनाथ सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गद्रे वाचनालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त वाचनालयास शुभेच्छा दिल्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते येथील श्रीमती मंगलाताई तारे अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी संचालक, वाचक उपस्थित होते.