Published On : Tue, Jan 21st, 2025
By Nagpur Today Nagpur News

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीच्या हातातील बाहुल्या;संजय राऊतांचा हल्लाबोल

Advertisement

मुंबई : महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर करण्यात आले. मात्र यावरून महायुतीत नाराजीनाट्य सुरु आहे. याअंतर्गत नाशिक आणि रायगड जिल्ह्याचा निर्णय रद्द करण्यात आला. यावरून शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रीपदाचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यात बदल केला. एरवी कडक शिस्त, कठोर निर्णय घेणारे मुख्यमंत्री म्हणून प्रतिमा असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना स्वतःचाच निर्णय का बदलावा लागला? पालकमंत्रीपदासाठी इतका हौरटपणा का?असा संतप्त सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

दिल्लीने मुख्यमंत्र्यांच्या निर्णयात हस्तक्षेप केला आहे. हे सरकार दिल्लीतून चालेल, असे आम्ही आधीपासून सांगत आलो आहोत. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे या कळसुत्री बाहुल्या आहेत आणि त्यांच्या हाता-पायांना बांधलेले दोरे दिल्लीतून नाचवले जातात, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे.

मुख्यमंत्री सरकारचा निर्णय घेऊन राज्यातील गुंडागर्दी, मनमानी मोडण्याचा प्रयत्न करत असताना दिल्ली रस्त्यावर येऊन पालकमंत्रीपदासाठी दंगल करणाऱ्यांच्या बाजूने उभी आहे. पालकमंत्रीपदासाठी दंगल महाराष्ट्राने याआधी पाहिली नव्हती, असा घणाघातही राऊत यांनी केला.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.