नवी दिल्ली : शिवछत्रपतींचा जयंती सोहळा आज राज्यासह देशभरात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शिवजयंतीनिमित्त एक खास व्हिडिओ पोस्ट करून शिवरायांना अभिवादन केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत, असे पतंप्रधान नरेद्र मोदी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही. हे फक्त राजा, महाराजा, राजपुरूष नाहीत, तर आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य देव आहेत. आमच्यासाठी आराध्य देवापेक्षा मोठे काही असू शकत नाही.
छत्रपती शिवाजी महाराजाचं शौर्य, विचारधारा आणि न्याय प्रियतेने अनेक पिढ्यांना प्रेरित केले आहे. त्यांची धाडसी कार्यशैली, सामरिक कौशल्य आणि शांततापूर्ण राजकीय पद्धती आजही आपल्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेत,अशा भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो.
त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी… pic.twitter.com/zu0vLviiPf
— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2025