Advertisement
मुंबई : जामिनावर सुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी ‘सिल्व्हर ओक’ या पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले.
जामिनावर जेलबाहेर आल्यानंतर छगन भुजबळ आणि शरद पवार यांची ही पहिलीच भेट आहे. जामीन मिळाल्यानंतर पहिला फोन शरद पवारांचा आला, असंही भुजबळांनी काल पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं होतं.
भुजबळ आज सकाळी आपल्या सांताक्रूझमधील निवासस्थानावरुन पवारांच्या भेटीसाठी गेले.