Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, May 7th, 2018

  बालाजीची शाल, बुधा हलवाईचे पेढे : भुजबळांचा रुग्णालयात सत्कार

  मुंबई : छगन भुजबळ यांच्या सुटकेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र उपचारासाठी अजूनही ते केईएम रुग्णालयातच आहेत.

  भुजबळ समर्थकांनी आज रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली व भुजबळांना बालाजीची शाल, नाशिकच्या बुधा हलवाईचे पेढे दिले; मोठा हार घालून त्यांच्या सत्कार केला.

  भुजबळांच्या भेटीसाठी नाशिकमधील कार्यकर्ते हळूहळू मुंबईत दाखल होत आहेत.

  फेसबुक लाईव्ह नाही

  दरम्यान, छगन भुजबळ आज समर्थकांशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र ते रद्द झालं आहे.

  दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी मनी लाँडरिंग कायद्याखाली छगन भुजबळ गेल्या दोन वर्षांपासून अटकेत होते. त्यांना शुक्रवारी 4 मे रोजी जामीन मंजूर झाला.

  हायकोर्टाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची कागदोपत्री सुटका बाकी होती. सुटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. भुजबळ डॉक्टरांच्या सल्ल्याने डिस्चार्ज घेऊन घरी जाऊ शकतात. त्यांना स्वादूपिंडाचा त्रास असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

  ”केईएमचे डॉक्टर्स उत्तम उपचार देत आहेत. कुटुंबीयांशी चर्चा करुन आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर घरी जाण्याचा निर्णय घेऊ,” अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

  जामिनाच्या अटी

  तब्बल दोन वर्षांनी छगन भुजबळ कारगृहातून बाहेर येणार आहेत. भुजबळांचं वय लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. बोलावतील तेव्हा चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहणं, साक्षीदारांना प्रभावित न करणं, या अटींवर छगन भुजबळांना जामीन मंजूर झाला.

  छगन भुजबळ यांनी 2 एप्रिल रोजी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला होता.
  दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी मनी लाँडरिंग कायद्याखाली छगन भुजबळ अटकेत होते. सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्याचे 45(1) हे कलम नुकतेच रद्द केले आहे. त्यामुळे माझी जामिनावर मुक्तता करावी, अशी भुजबळ यांची मागणी होती.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145