Published On : Thu, Dec 28th, 2017

बुद्धीबळ स्पर्धेत दीपेश,मैथिली, संस्कार, कृपाल,मृणाल, हिमांशु, हर्ष, रोहन यांना विजेतेपद

नागपूर: नागपूर महानगरपालिका आणि ब्रिलियंट्स चेस अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्व.देविदास देशमुख स्मृती बुद्धीबळ आंतरशालेय स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ नंदनवन येथील अक्षय भवन येथे आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर दीपराज पार्डीकर, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, नगरसेवक किशोर कुमेरिया, दिव्या धुरडे प्रामुख्याने उपस्थित होते.

विविध वयोगटात दीपेश कोहाड, मैथिली, संस्कार, गायगोर, वृतिका गये, कृपाल वंजारी, मृणाल कोकाटे, हिमांशु जेठवानी, दिव्या शेळके, हर्ष जेठवानी, श्रावणी शिरपूरवार, रोहन सिंग विजेते ठरले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले.

उपमहापौर दीपराज पार्डीकर बोलताना म्हणाले, अशाप्रकारच्या स्पर्धेमुळेच खेळाडू तयार होत असतो. यातूनच राज्यस्तरावरील, राष्ट्रीयस्तरावरील खेळाडू तयार व्हावे यासाठीच अशा प्रकारच्या सर्व स्पर्धेचे आयोजन महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे.

कार्यक्रमाचे संचालन श्री.कुंभलकर यांनी तर आभारप्रदर्शन सौ.कोकाटे यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. नीरज सव्वालाखे, सोनिया चांगले, डॉ. सुशील वंजारी, आशिष देशमुख, सौ.सुवर्णाताई भुते, प्रवीण पानतावणे, नीलेश चन्नमवार, मनीष पागे, वैशाली वंजारी, आरती खंडेलवाल उपस्थित होते.