छत्रपतींच्या जयंतीच्या तारखेचा वाद सत्ताधारीच निर्माण करीत आहेत – धनंजय मुंडेंचा आरोप

Dhananjay Munde
नागपूर: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या तारखेचा वाद सत्ताधारीच निर्माण करीत असून, या प्रकरणी सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. विधान सभेत आज सत्ताधारी भाजपाच्या एका सदस्याने उपस्थित केलेल्या मुद्याचा संदर्भ घेत विधान परिषदेत धनंजय मुंडे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधून सत्ताधारीच छत्रपतींच्या जयंतीच्या तारखेचा वाद निर्माण करीत असल्याचा आरोप केला.

नाशिकच्या शस्त्रसाठ्याबाबत माहिती द्यावी
नाशिकच्या चांदवड मध्ये सापडलेल्या मोठ्या शस्त्रसाठ्याचा विषय विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात उपस्थित करून एवढा मोठा साठा सापडल्याची घटना गंभीर असून, हा साठा नेमका कुठे जात होता, घातपाताची शक्यता आहे काय ? याबाबत सरकारने सभागृहामध्ये माहिती द्यावी अशी मागणी श्री.मुंडे यांनी सभागृहामध्ये केली.