Published On : Tue, Jun 14th, 2022
By Nagpur Today Nagpur News

चारपदरी महामार्गावरील वराडा बंद टोल नाका परिसरात लावलेले लोखंडी रेलींग चोरी.

Advertisement

– मुद्दमाल सह दोन वाहन जप्त करून पाच आरोपी ना अटक.


पारशिवनी : – तालुक्यातील पो.स्टे. कन्हान अंतर्गत ०५ किमी. अंतरावरील वराडा शिवारातील बंद टोल नाका परिसरात महामार्ग लगत लावलेले रँलिंग चोरी करून नेल्याने कन्हान पोलीसानी पाच आरोपी वर गुन्हा दाखल करून मुद्देमालासह वापरात आणले ले दोन चारचाकी वाहन जप्त करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.

शनिवार दि.११/०६/२०२२ ला सायंकाळी ६ वा. ते रविवार दि. १२/०६/२०२२ चे सकाळी १० वा. दरम्यान दिलीप श्यामरावजी बावने वय ४६ वर्ष, राह. स्वामी विवेकानंद नगर कन्हान सुपरवायझर टोल नाका हे स्टॉपसह पेट्रोलींग करीत असतांना वराडा शिवार बंद टोल नाका नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्ग क्र ४४ च्या लगत रोडवर लावलेले लोखंडी ४ रेलींग प्रत्येकी ३ मिटर लांबी अर्धा मिटर रुदीची रेलींग दिसुन आली नाही. लोखंडी ४ रेलींग प्रत्येकी किमत ४,८०० रूपये प्रमाणे एकुण १९,२०० रूपयाचा मुद्देमाल पाच आरोपी
१) शिवनंदन नवरंग सिंग वय ३१ वर्ष. राह. राममंदिर च्या मागे टेकाड़ी वेकोली कालोनी,
२) कन्हैया काशिराम धुर्वे वय २० वर्ष राह. खदान नं. ४ व
३) सोहेल अब्दुल खान वय २० वर्ष राह. खदान नं.६ यांनी चोरीतील जप्त मुद्देमाल चोरी केल्याचे निष्पन झाल्याने आरोपी
४) शिवचरण रविकिरण शाहु वय २४ वर्ष ५) रविकिरण दुर्गाप्रसाद शाह वय ५५ वर्ष दोन्ही राह.

Gold Rate
24 April 2025
Gold 24 KT 96,500 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver / Kg 98,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नाका नं ४ शनि मंदिर च्या मागे कळमना नागपुर यांचे जवळुन मुद्देमाल सह उपयोगात आणलेले चारचाकी वाहन १) एम एच ४९ ए टी २३३०, २) एम एच ३१ सि आर ३७८६ ला मुद्दे माल सह जप्त करण्यात आले.

असुन या प्रकरणी फिर्यादी दिलीप बावने सुपरवाईझर यांच्या तोंडी तक्रा रीवरून पो.स्टे. कन्हान येथे पाच ही आरोपी विरुध्द अप. क्र. ३६१/२२ अन्वये गुन्हा नोंद करून कलम ३७९, ४११, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून कन्हान थानेदार विलाश काळे यांचे मार्गदर्शनात सहायक पो नि फुलझेले सह सहायक फौजदार गणेश पाल हे पुढील तपास करीत आहे.

Advertisement
Advertisement