Published On : Tue, Jul 25th, 2017

चापेगडी, शेडेश्वर, चिखलापार उपकेंद्र मार्चमध्ये सुरु करणार

Advertisement


नागपूर
: उमरेड विधानसभा मतदार संघातील वीज ग्राहकांना चांगल्या दाबाने आणि अखंडित वीज पुरवठा मिळावा म्हणून महावितरणची ५ नवीन उपकेंद्र सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या पैकी ३ उपकेंद्र मार्च-२०१८ पर्यंत सुरु होतील,अशी घोषणा राज्याचे ऊर्जा मंत्री आणि पालक मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी चापेगडी उपकेंद्राच्या भूमिपूजन प्रसंगी केली.

ऊर्जामंत्री नामदार चंदशेखर बावनकुळे यांनी यावेळी कुही तालुकयातील अदम आणि भिवापूर तालुक्यातील कारगाव (तास ) या उपकेंद्राचे लोकार्पण केले. तसेच कुही तालुकयातील चापेगडी, उमरेड तालुकयातील शेडेश्वर, भिवापूर तालुक्यातील चिखलापार उपकेंद्र ३१ मार्च पूर्वी सुरु करण्याचे नियोजन आहे. उमरेड विधान सभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात ३३ कि. व्हो. उपकेंद्राचे जाळे निर्माण होणार असल्याने बेला परिसरात महापारेषणचे १३२ कि. व्हो.च्या उपकेंद्रास आपण लवकरच मान्यता देणार असल्याची घोषणा या वेळी त्यांनी केली.

प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात वीज,पाणी, रस्ता आणि रोजगार देणे, ही राज्य शासनाची भूमिका आहे. या नुसार ग्रामीण भागात महावितरणचे जाळे मजबूत करण्याचा ऊर्जा विभागाचा मानस आहे. ग्रामीण भागात जेथे नवीन उपकेंद्र आहे त्या ठिकाणी दोन मोठे हॅलोजन दिव्याचे मनोरे उभारून गाव प्रकाशमान करणार आहे. असॆ ऊर्जा मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. कार्यक्रमास आमदार सुधीर पारवे, जि . प. अध्यक्ष निशा सावरकर, महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता उमेश शहारे , नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे , अधीक्षक अभियंता (स्थापत्य) राकेश जनबंधू , भिवापूर पंचायत समिती सभापती केशव ब्रम्हे, कुही पंचायत समिती सभापती सुनीता पडोळे , उमरेड पंचायत समिती सभापती शालू मेंढुले , जि. प. सदस्य आनंदराव राऊत,पद्माकर कडू, योगिता चिमुरकर, ,शालू हटवार , जयकुमार वर्मा, कार्यकारी अभियंता प्रफुल लांडे आदी मान्यवर उपस्थित होते.