नागपूर : नागपूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याकरिता बावनकुळे यांनी कंबर कसली असून बैठकांचे सत्र सुरु केले.
बावनकुळे यांनी 17 जानेवारीला शुक्रवारी जिल्हा परिषद, नागपूर महापालिका, राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभागात बैठका लावल्या आहेत. या माध्यमातून ते तीनही विभागाच्या कार्याचा आढावा घेणार आहेत. नागपूर जिल्हा परिषदेचा कार्यकाळ आज संपणार आहे. येथे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान महायुतीचे सरकार स्थापन होऊन सुमारे एक महिना झाला तरीही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा झालेली नाही. देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात बावनकुळे हे ऊर्जा मंत्री होदते. त्यांना नागपूरचे पालकमंत्री करण्यात आले होते. या पाच वर्षांत त्यांनी ऊर्जावान मंत्री म्हणून आपली ओळख निर्माण केली हेाती.
केंद्रीय मंत्री अमित शाहा यांनीही बावनकुळे यांचे तोंडभरून कौतुक केले होते. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीसुद्धा बावनकुळे यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख केला आहे. देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांची सर्वानाच माहिती आहे. फडणवीस यांनी बावनकुळे यांना महसूलमंत्री पद दिले आहे. हे सर्व बघता नागपूर जिल्ह्याचे पालकत्व बावनकुळे यांच्याकडे सोपवले जाणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही.