चंद्रशेखर बावनकुळे यांचा शुक्रवारी जाहीर नागरी सत्कार

नागपूर: राज्याचे माजी ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा कामठी येथील जाहीर नागरी सत्कार समिती तर्फे शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे. श्री गंज के बालाजी तीर्थक्षेत्र जे एन रोड कामठी येथे हा कार्यक्रम होईल.

या सत्कार कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे या राहतील. यावेळी प्रामुख्याने आ. टेकचंद सावरकर, कामठी न.प.चे नगराध्यक्ष शहाजहा शफाअत, श्री टेजरामजी जैन उपस्थित राहतील. कामठी येथिल ख्यातनाम 60 सामाजिक संस्था या सत्कार समारोहात सहभागी होणार आहेत.

कामठीत गेल्या 5 वर्षात जी विकास कामे झाली आणि सध्या सुरू आहेत त्या कामांचे शिल्पकार माजी पालकमंत्री बावनकुळे आहेत.
या सत्कार समारोहाला परिसरातील नागरिकांनी आणि बावनकुळे यांच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सत्कार समितीने केले आहे.