Published On : Wed, Nov 21st, 2018

चंद्रशेखर बावनकुळे यांनी अवैध दारु विक्री व जुगार अड्ड्यावर धाड

Advertisement

नागपूर : नागपूर नजीकच्या महादुला येथील संभाजी नगर येथे बुधवारी सकाळी ७.३० वाजता राज्याचे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अवैध दारु विक्री व जुगार अड्ड्यावर धाड टाकली. उत्पादन शुल्क मंत्र्यांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध दारु विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

या ठिकाणी काही दिवसांपासून हा दारु विक्री आणि जुगार अड्डा सुरु होता. उत्पादन शुल्क मंत्र्यांना याची माहिती मिळताच त्यांनी स्वत: महादुल्यातील संभाजीनगर येथे जावून कारवाई केली. यावेळी त्यांच्यासोबत अबकारी विभाग आणि कोराडी पोलिसांचा ताफा होता.

साधरण: चार हजार चौरस वर्ग फूट क्षेत्रात हा एका टीनाच्या शेडमध्ये हा अवैध बार आणि जुगार अड्डा चालत होता. उत्पादन शुल्क मंत्र्यांना या अड्ड्यात तास पत्ते आणि दारु बॉटल्स आढळून आल्या. यानंतर बावनकुळे यांनी वरिष्ठ अधिकाºयांना या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले. यानंतर लगेच या बार आणि जुगार अड्ड्यातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला.

महादुला नगर पंचायच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या वतीने बुलडोजरच्या सह्याने टीनाचे शेड तोडण्यात आले. या कारवाईनंतर पोलिसांनी अड्ड्याचा चालक संतोष शाहु याला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.