Published On : Mon, Oct 26th, 2026
By Nagpur Today Nagpur News

चंद्रपूरच्या सिंदेवाहीत वाघाची दहशत; २४ तासांत शेतकरीसह अंगणवाडी सेविकेचा बळी

Advertisement

चंद्रपूरच्या सिंदेवाहीत वाघाची दहशत; २४ तासांत शेतकरीसह अंगणवाडी सेविकेचा बळीचंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यात मानव-वन्यजीव संघर्ष गंभीर बनला असून, अवघ्या २४ तासांत वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी पळसगाव (जाट) येथे शेतकऱ्याचा बळी गेल्यानंतर रविवारी भेंडाळा शिवारात तीळ कापणी करणाऱ्या अंगणवाडी सेविका प्रेमीला पुंडलिक महाडोरे (५६) यांच्यावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.

प्रेमीला महाडोरे या भेंडाळा येथील अंगणवाडीत सेविका म्हणून कार्यरत होत्या. रविवारी सुट्टी असल्याने त्या पती पुंडलिक महाडोरे यांच्यासोबत शेतात तीळ कापणीसाठी गेल्या होत्या. दुपारी सुमारे चार वाजता पती विहिरीवरील मोटारीकडे गेले असताना, दुसऱ्या बांधीत काम करणाऱ्या प्रेमीला यांच्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला.

पत्नीचा आवाज ऐकू न आल्याने पतीने शोध घेतला असता त्या रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळल्या. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात पाठविला.

यापूर्वी शनिवारी पळसगाव (जाट) येथे नानाजी नारायण कामडी (५५) यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. सलग दोन दिवस घडलेल्या घटनांमुळे शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पीक काढणीच्या हंगामात शेतात जाणेही धोकादायक ठरत असल्याने वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा आणि मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.