Published On : Thu, May 10th, 2018

चंद्रपूर आरटीओ ने केल्या १० खाजगी बसेस जप्त

चंद्रपूर: गैर परवाना सर्रास वाहतूक सेवा पुरविणाऱ्या तब्बल १७ खाजगी बसेस वर चंद्रपूर आरटीओ ने कारवाई करत यातील १० बसेस जप्त केल्या आहे.

चंद्रपूर-नागपूर, चंद्रपूर-गडचिरोली या मार्गाने सुमारे १५०पेक्षा जास्त बसेस रोज धावतात. मात्र, अनेक बसमालक पैसे कमावण्याच्या नादात
क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करीत आहेत. अनेक मालकांनी आपल्या वाहनांच्या परवान्याचे नूतनीकरणही केलेले नसल्याची बाब या कारवाईने समोर
आली आहे. परवाना नसताना या बस रस्त्यावर धावत होत्या.

त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात असल्याच्या तक्रारी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. त्यामुळे परिवहन अधिकाऱ्यांनी वाहतूक पोलीस
शाखेसोबत संयुक्त मोहीम राबवण्याचे नियोजन केले. त्याचाच भाग म्हणून पहिल्या दिवशी १७ बसेसवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत १० बसेस जप्त ही करण्यात आल्या आहेत.