Published On : Sat, Aug 24th, 2019

पाच वर्षात स्कूटरवाले झालेत पाचशे कोटींचे मालक,ईडीची चौकशी तर होणारच- चंद्रकांत पाटील

Advertisement

नागपूरात पत्रकारांशी साधला मनमोकळा संवाद

नागपूर: महाराष्ट्रातून राज ठाकरे,अजित पवार इ.यांच्याशिवाय सक्तवसुली संचनालय( ईडी)च्या रडारवर अाणखी कोण आहेत हा प्रश्‍न भारतीय जनता पक्ष्ाचे प्रदेशाध्यक्ष् चंद्रकांत पाटील यांना शनिवारी दि.२४ ऑगस्ट रोजी सिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लब येथे दुपारी घेण्यात आलेल्या पत्र परिषदेत विचारला असता पत्रकारांनी असा प्रश्‍न विचारणे योग्य नाही,तुम्ही आमचे विरोधक नाहीत, नागपूरच्या पत्रकारांकडून वेगळ्याप्रकारच्या पत्रकारितेची अपेक्ष्ा आहे,तुमच्या माध्यमातून राज्यातील इतर पत्रकारांना चालना मिळते,नागपूरचे पत्रकार हे ज्ञानी आहे,त तसेही ईडी ही स्वायत्त संस्था आहे, सरकारचा त्यात हस्तक्ष्ेप नसतो, सर्वात महत्वाचे म्हणजे न्यायालयीन आदेशानंतर राज ठाकरे व अजित पवार यांची चौकशी करण्यात आली आहे.भूजबळ यांना देखील न्यायालयीन आदेशानंतरच चौकशीला सामोरे जावे लागले, पाच वर्षांपूर्वी जे स्कूटरवर फिरत होते त्यांची संपत्ती चारशे आणि पाचशे कोटीच्या घरात पोहोचते तेव्हा ईडीची चौकशी तर पाठीमागे लागणारच,हा काही राजकीय डावपेच नाही असे ते म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि परिवारातील संघटनांच्या दोन दिवसीय बैठकीसाठी ते नागपूरात आले होते. प्रदेशाध्यक्ष् झाल्यानंतर ते प्रथमच नागपूरात आले,या पार्श्वभूमीवर त्यांनी शनिवारी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. चौकशी अशी एका दिवसात लागत नसते त्यामागे खूप संशोधन करावे लागते, पुरावे गोळा करावे लागतात,कर वसुली विभागाची धाड देखील एकदम पडत नाही,त्यासाठी पण खूप अभ्यास करावा लागतो,कोणी,किती,कशी माया जमवली ती.न्यायालय दस्तावेज मागतात तर सरकारला ती द्यावीच लागतात असे ते म्हणाले.पुढच्या मंत्रीमंडळात तुम्ही मुख्यमंत्री म्हणून दिसणार आहात का?या प्रश्‍नावर हसून मुख्यमंत्री नागपूरचेच आहेत,तुम्ही पत्रकारांनी तरी त्यांच्याच मागे ठामपणे उभे राहायला पाहिजे अशी मिश्‍किली त्यांनी केली. महाजनादेश यात्रेबाबत बोलताना, ज्या जनतेनी सरकारला पाच वर्षे सत्ता चालविण्यासाठी कौल दिला त्यांचे आभार मानायला,सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत नीट पोहोचल्या की नाहीत,आणखी काही त्यांच्या सूचना आहेत का?यासाठी ही जनादेश यात्रा असल्याचे ते म्हणाले. महाजनादेश यात्रा विरोधक म्हणतात तशी घाबरुन काढली नाही. मुख्यमंत्री यांनीच हा पायंडा पाडला प्रत्येक आमदाराने वर्ष पूर्ती नंतर आपल्या कामाचा अहवाल जनतेच्या दरबारात मांडावा. पुरग्रस्तांच्या प्रश्‍नावर बोलताना राज्य सरकारने तातडीने ६,५०० कोटींची राशि द्यायला सुरवात केली असून केंद्राकडून देखील मदत मिळणार असल्याचे ते म्हणाले.

तीनशे टक्के शिवसेनासोबत युती-
विधानसभा निवडणूकीत शिवसेनेसोबत युतीचे काय? या प्रश्‍नाचे उत्तर देताना शंभर टक्के नव्हे तर तीनशे टक्के युती ही होणारच असे ते म्हणाले कारण युती ही दोघांनाही हवी आहे याशिवाय भाजप व सेना हे दोन्ही पक्ष् एका विशिष्ट वैचारिक विचारसरणीवर चालणारे पक्ष् आहेत.शिवसेनेलाही ही जाणीव आहे. सध्या विद्यमान आमदार यांच्या जागांबाबतच्या धोरणात त्यांना हात लावायचा नाही हाच आहे मात्र दोन्ही पक्ष्ांची बैठक गणेशोत्सवात होईल त्यात निर्णय घेतला जाईल. जागा वाटप हा संख्यात्मक विचार आहे राज्य म्हणून एकत्रित विचार होईल.शक्यतो विद्यमान आमदारांच्या जागा एकमेकांना मागायच्या नाही असाच प्रयत्न राहील.विधान परिषदेचे विरोधी पक्ष् नेते हे देखिल पक्ष्ात येत आहेत का?या प्रश्‍नावर हसून त्यांनी ‘चर्चा सुरु आहे’ असे नेहमीच्या अंदाजात मोघम उत्तर दिले. उदयन राजे भोसले यांच्याविषयी विचारले असता, ते छत्रपतींचे वंशज आहेत, त्यांच्याविषयी आदर आहे मात्र भाजपमध्ये प्रवेशाबाबत त्यांचा निर्णय झाला नाही. पुण्यातील गणेश मंडळाच्या बैठकीत हा देश बहूसंख्य हिंदूंचा असून बहूसंख्य हिंदूच्या अनुसारच देश चालणार,या विधानाबाबत त्यांना छेडले असता,गणपती मंडळात पुररस्कार देण्याच्या कार्यक्रमातील हे वक्तव्य असून पोलिसांविषयी मंडळांच्या अनेक तक्रारी होत्या. तेव्हा पोलिस किंवा प्रशासन हे काही त्रास द्यायला बसले नाहीत,ही भावना आधी काढा असे त्यांना सांगितले. प्रशासनात ही हिंदू आहेतच, ते कट्टर विरोधक नाहीत, त्यांनाही बायका-मुले आहेत,कुटुंबियांसोबत गणपतीचा देखावा बघावा असे त्यांनाही वाटते,असे मी बोललो होतो,असा खुलासा त्यांनी केला.

महाराष्ट्रात संघटना आणखी बळकट करणार-
महाराष्ट्रात भाजप संघटनेतील सदस्य संख्या ही १ कोटी ६ लाख होती. याच महिन्यात ती ५० लाखांने वाढवणार आहे. ऑन लाईन व ऑफ लाईन धरुन ही संख्या सध्या ३२ लाख झाली आहे. चार-पाच लाख सदस्यांनी दुसर्यांदा सभासत्व भरले असतील तर ते साईटवरुनच डिलीट होतील. गेल्या काही वर्षात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘बूथ’नावाच्या सत्ता केंद्रावर पक्ष् आणखी बळकट केल्याचे त्यांनी सांगितले. पाच वर्षात भाजप एकही निवडणूक हरला नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एक ही निवडणूक जिंकले नाही. ही यादी खूप मोठी आहे. पुराचा अंदाज आला नाही तसा जागांचा अंदाज कसा घेता? हा प्रश्‍न पश्‍चिम महाराष्ट्रातील एका पत्रकाराने विचारला असल्याची आठवण पाटील यांना करुन देता,अंदाज नाही खात्री आहे,असे ते म्हणाले. पुढील निवडणूकीत युतीची सत्ता आल्यास पत्रकार व वकील यांना सुरवातीचे तीन वर्षे शासाकडून स्टायफंड देण्याची योजना ही लागू करण्याचा विचार सुरु असल्याचे ते म्हणाले.

३० वर्षांसाठी जागा लिजवर दिल्याने प्रेस क्लबने मानले आभार-
नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी तीन वर्षांसाठी दिलेल्या स्वाती या बंगल्याला प्रेस क्लबसाठी आणखी तीस वर्षांची मान्यता दिली. याबाबत प्रेस क्लबचे अध्यक्ष् प्रदीप मैत्र, कोषाध्यक्ष्,सचिव, ब्रम्हशंकर त्रिपाठी,शिरीष बोरकर यांनी पाटील यांचे विशेष आभार मानले. प्रारंभी भाजपचे माजी वित्त मंत्री अरुण जेटली यांना श्रेद्धांजली वाहण्यात आली. विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून जेटली यांच्याशी निकटचा संपर्क होता असे ते म्हणाले.१३ वर्षे संघटनेत विना वेतन काम केले. १९८२ पासून विदर्भात देखील संघटनेचे काम पाहिले. त्याकाळी जेटली हे विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष् होते. कर्तृत्व व नम्रता हे दोन्ही गुण एकाच माणसात आढळत नाही मात्र अरुण जेटली याला अपवाद होते,असे ते म्हणाले.