Published On : Fri, Aug 14th, 2026
By Nagpur Today Nagpur News

उत्तराखंडच्या चमोलीतील बोगदा दुर्घटनेत ७ मजुरांचा मृत्यू; १८ जणांची सुटका

Advertisement

चमोली : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील पीपलकोटी परिसरात निर्माणाधीन बोगद्यात मोठी दुर्घटना घडली. बोगद्यात अचानक मोठ्या प्रमाणात पाणी आणि गाळ शिरल्याने मजूर अडकले. या दुर्घटनेत ७ मजुरांचा मृत्यू झाला असून १८ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. अडकलेल्या इतर मजुरांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.

गुरुवारी सायंकाळी साडेसहा ते पावणेसातच्या सुमारास बोगद्याच्या सुमारे १.८ किलोमीटर आत असलेल्या पोकळीतून अचानक मोठ्या प्रमाणात पाणी आणि गाळ बाहेर आला. यावेळी बोगद्यात काम सुरू असल्याने मजुरांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली. काही क्षणांतच गाळ आणि पाण्याने बोगद्याचा मोठा भाग व्यापला आणि अनेक मजूर आत अडकले.

Gold Rate
Sept 29,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 47,300 /-
Gold 22 KT ₹ 1,36,5700 /-
Silver/Kg ₹ 2,22,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ, एनडीआरएफ, जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके घटनास्थळी दाखल झाली. रात्री गाळ मोठ्या प्रमाणात जमा झाल्याने काही काळ बचावकार्य थांबवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दुर्घटनेची गंभीर दखल घेत बचावकार्य वेगाने राबवण्याचे निर्देश दिले आहेत. बोगद्यात अडकलेले बहुतांश मजूर छत्तीसगड आणि झारखंडमधील असल्याने धामी यांनी संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशीही संपर्क साधला आहे.

Advertisement

दरम्यान, गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही चमोलीतील बोगद्यात दोन लोको ट्रेनची धडक होऊन ७० जण जखमी झाले होते. त्यामुळे या दुर्घटनेनंतर बोगदा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.