Published On : Thu, Apr 6th, 2017

वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती

Nagpur: नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीचे सभापती मनोज चाफले यांचा पदग्रहण समारंभ सोमवारी (ता. ३ मार्च) मनपाच्या आरोग्य विभागात पार पडला. यावेळी महापौर नंदा जिचकार,आमदार विकास कुंभारे, आमदार कृष्णा खोपडे, उपसभापती प्रमोद कौरती,महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती श्रद्धा पाठक यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी महापौर नंदाताई जिचकार यांनी सभापती मनोज चाफले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. वैद्यकीय सेवा आणि आरोग्य समितीच्या माध्यमातून शहरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहील, यासाठी विविध उपक्रम राबविले जातील आणि स्वाईन-फ्लू सारख्या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येईल, असा विश्वास महापौर नंदाताई जिचकार यांनी यावेळी व्यक्त केला आणि मनोज चाफले यांनी शुभेच्छा दिल्यात.

आपल्यावर जो विश्वास महापौरांनी आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी टाकला तो विश्वास सार्थ ठरवीन, असे उद्‌गार नवनिर्वाचित सभापती मनोज चाफले यांनी काढले. यावेळी नगरसेविका दिव्या धुरडे, वंदना यंगटवार, चेतना टांक, जयश्री रारोकर, नगरसेवक अमर बागडे आदी उपस्थित होते.