नागपूर: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने नागपूर-पुणे दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या 13 एप्रिलपासून 25 मे दरम्यान धावणार असून, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी पाहायला मिळते. अनेक प्रवासांचे आरक्षण तीन महिने आधीच ‘फुल’ झाले होते. नागपूर-मुंबई आणि नागपूर-पुणे मार्गांवर ही गर्दी सर्वाधिक असते. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने 14 आठवड्यांतून एकदा धावणाऱ्या वातानुकूलित विशेष गाड्यांची योजना आखली आहे.
विशेष गाड्यांची वेळापत्रक-
गाडी क्रमांक 01440: ही विशेष गाडी 13 एप्रिल ते 25 मे दरम्यान प्रत्येक रविवारी संध्याकाळी 4.15 वाजता नागपूरहून निघेल आणि सोमवारी सकाळी 7.20 वाजता पुण्याला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01439: ही विशेष गाडी 12 एप्रिल ते 24 मे दरम्यान प्रत्येक शनिवारी रात्री 7.55 वाजता पुण्याहून निघेल आणि रविवारी पहाटे 12.45 वाजता नागपूरला पोहोचेल.
थांबे -या गाडीचे थांबे दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा आणि वर्धा येथे असतील. डब्यांची रचना-
या गाडीत 8 वातानुकूलित द्वितीय श्रेणीचे डबे, 10 वातानुकूलित तृतीय श्रेणीचे डबे आणि 2 जनरेटर डबे असतील. उन्हाळ्यातील प्रवास अधिक सुसह्य करण्यासाठी मध्य रेल्वेने केलेली ही विशेष व्यवस्था प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणार आहे.