Published On : Thu, Oct 26th, 2017

केंद्रीय मंत्री,मुख्यमंत्र्याचे दुर्लक्ष मेडिकल कॉलेज रुग्णालय मृतप्राय-डिनची अंतयात्रा काढली

नागपूर: पिपळा डाक बंगला सावनेर रोड येथील लीलाबाई खोब्रागडे वय ५५ पोटदुखी च्या आजारासाठी मेडिकल कॉलेज वार्ड २४ मध्ये भर्ती झाल्या त्यांची प्रकृती गंभीर झाली वेंटीलेटर उपलब्ध नसल्यामुळे त्या मरण पावल्या मेडिकल मध्ये रुग्ण भर्ती झाली असता मेडिकल ने पूर्ण तयारीनिशी उपचार करण्यासाठी तयार राहावे वेंटिलेटर नाही आहे तर ते मागावून घ्यावे नादुरूस्त वेंटिलेटर सुधरून व वेंटीलेटरची संख्या वाढवावी मेडिकल मध्ये आलेल्या रुग्णमृत्युचा छायेतच जातो उपचारा अभावी मृत्यु पावतो मेडिकल मध्ये यावे जगण्यासाठी नाही मरण्यासाठी यावे हे सिद्ध होते.

डीनला निवेदन देण्यासाठी वेळ मागितला असता डीन ने निवेदन घेण्यास मनाई केली व आमची मागणी धुडकावून लावली अशी वागणूक लोकप्रतिनिधिला मिळत आहे तर सामान्य जनतेचे काय ? लोकप्रतिनिधिचे कामच आहे की समस्यावर मार्ग काढ़ने पण डीन अभिमन्यु निसवाडे ची अरेरावी प्रचंड प्रमाणात वाढली आहे माहित नाही त्यांना कोणाचा वरहस्त आहे त्यांच्यावर कोणाची कृपादॄष्टी आहे म्हणून हे लोकप्रतिनिधिशी असे वागतात म्हणूनच प्रमुखच असा वागतो तर त्यांचे डॉक्टरही तसे वागतात म्हणून जनते कडून मार खातात.

स्थानिक सूत्रा कडून कळाले की आशियातील सर्वात मोठ्या रुग्णालयात फक्त ३० वेंटिलेटर आहे.त्यापैकी निम्मे वेंटिलेटर नादुरूस्त आहे.नागपूर लोकसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी शेळके तडक मेडिकल कॉलेज मध्ये पोहचले व मेडिकल कॉलेजचे डीन अभिमन्यु निसवाडे यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध नव्हते बंटी शेळके म्हणाले की मेडिकल कॉलेज सारख्या रुग्णालयात खास करुन केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्र्यांच्या शहरात आरोग्य सुविधेची अशी बोंब आहे.मुख्यमंत्र्यांना शहरातील जनतेच्या आरोग्याशी काही देणे घेणे नाही.असे सिद्ध होते शहरात संपूर्ण यंत्रणा भाजपाच्या हातात आहे.महापौर-उपमहापौर सहित ११२ नगरसेवक ९ आमदार ३ खासदार शहरात आहे हे काम करीत आहे का ? असा सवाल सर्वसामान्य जनतेला पड़ला आहे ?

समाजपयोगी कामात हे नेते लक्ष देत नाही पण कमीत-कमी जनतेच्या आरोग्याशी खेळू नये म्हणून आजनागपूर लोकसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी शेळके व माजी शहर NSUI अध्यक्ष शहबाज़ सिद्दीकी, पूर्व नागपूर ब्लॉक अध्यक्ष अयाज़ शेख च्या नेतृत्वात सर्व जनतेला आरोग्य सुविधा मिळण्यासाठी मेडिकल मध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले.आंदोलनाचे वैशिष्ट म्हणजे मेडिकल कॉलेज च्या डीन ची तिरडी पकडून अंत्ययात्रा काढली डीन मेडिकल मध्ये दलालाचे समर्थन करित आहे.तेथे मोठ्याप्रमाणत दलालांचा वावर आहे.बाहेरून आलेल्या व स्थानिक रुग्णाचे हाल होत आहे.जे रुग्ण दलालांच्या संपर्कात येतात त्यांनाच आरोग्य सुविधा मिळते।बाकी रूग्ण आरोग्य सेवे पासून वंचित राहतात.

नागपूर लोकसभा युवक कॉंग्रेस चेतावनी देत आहे की मेडिकल मधील आरोग्य सेवा सुधारली नाही तर आज अत्यंयात्रा काढली यानंतर डीनला मेडिकल मध्ये पाय ठेवू देणार नाही व तीव्र आंदोलन करून भ्रष्ट जनप्रतिनिधीच्या घरासमोर ठीय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागपूर लोकसभा युवक कॉंग्रेस ने दिला. आजच्या या आंदोलनात नगरसेवक कमलेश चौधरी,नागपूर लोकसभा युवक कॉंग्रेसचे महासचिव राकेश निकोसे,निलेश देशभ्रतार,वसिम शेख,राजेंद्र ठाकरे,फैज़लुर रहमान कुरैशी,विक्की बढ़ेल,शाहबाज़ खान चिस्ती,शेख अजहर,स्वप्निलबावनकर,सौरभ शेळके,हेमंत कातुरे,फरदीन खान,पूजक मदने,देवेंद्र तुमाने,कृणाल जोध,नितिन सुरुशे,आशीष लोनारकर इत्यादि उपस्तिथ होते.