Published On : Wed, Sep 25th, 2019

विद्यासागर कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचा पन्नासावा स्थापना दिवस साजरा

Advertisement

रामटेक : राष्ट्रीय सेवा योजनेला 24 सप्टेंबरला 50 वर्ष पूर्ण होत आहेत त्याचप्रमाणे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त 24 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2019 रासेयो सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने विद्यासागर कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. ज्योती कवठे उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. सुरेश सोमकुवर उपस्थित होते. डॉ. सोमकुवर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य आणि महत्व या विषयावर मार्गदर्शन करून राष्ट्र निर्मिती साठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयं सेवकांची भूमिका किती महत्वाची आहे हे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले.

कार्यक्रम अधीकारी डॉ गिरीश सपाटे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सतीश महल्ले यांनी सूत्रसंचालन केले. प्रफुल्ल वाडीभस्मे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.